अमेरिकेतील सिएटलमधील एका कार्ड पेमेंट्सच्या कंपनीच्या बॉसने आपल्या कंपनीच्या स्टाफला ७० हजार डॉलरर्स म्हणजेच ५० लाख रुपयांचे कमीतकमी वेतन देण्याचे जाहीर केले. ही गोष्ट २०१५ मधील आहे. पण या कंपनीचा मालक पाच वर्ष झाले तरी स्वतः कमी पगार घेतो.
प्राईस डॅन आपली मैत्रीण वॅलरी हिच्यासोबत सिएटलच्या पर्वतांवर सफर करत होते. तेव्हा त्यांना एक गोष्ट कळली. त्यामुळे ते हैराण झाले. चालता चालता वॅलरीने सांगितले की तीचं जीवन खूपच त्रासदायक झालं आहे. तीच्या घरमालकाने घरभाडे २०० डॉलर वाढवले आहे. म्हणून तिला खर्चायला पैसे कमी पडतात आणि दोन ठिकाणी काम करावं लागतं. त्यामुळे प्राईड हैराण झाले.
त्यांच्या मनात एक विचार आला की अमेरिकेतील माणसाला खूश ठेवण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणून प्राईसने वॅलरीला प्रॉमिस केलं. की त्यांच्या कंपनीत कमी पैशात काम करत असलेल्या लोकांचा पगार वाढवण्यात येईल. तेव्हा लगेचच प्राईसने आपल्या कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची मिटिंग घेतली आणि त्यांना ही गोष्ट सांगितली. प्राईड यांना वाटलं की लोक हे ऐकून खूप आनंदी होतील. पण असं झालं नाही वातावरण खूपच शांत झालं होतं.
त्यांचं असं म्हणणं आहे की कमीतकमी ७० हजार डॉलर दिल्यामुळे कंपनीतील टिमच्या २ ते ३ लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. पण मागच्या अनेक वर्षात लोकसंख्या वाढत असल्यामुळे वेतन वाढणं सुद्धा गरजेचं आहे. कंपनीचे १० टक्के कर्मचारी असे आहेत. ज्यांनी अमेरिकेच्या शहरात आपले घर घेतले आहे. या आधी हा आकडा १ टक्के होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जाते की, याआधी २०१५ मध्ये डॅन प्राइसने स्वत:च्या पगारात ८० ते ९० टक्के कपात केली होती. तेव्हा त्यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना ७० हजार डॉलर पगाराची घोषणा केली होती. त्यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, 'मी समस्यांचा भागीदार होऊन शकलो आहे, मला समाधानाचा भागीदार व्हायचं आहे. आधी मी दर वर्षी एक मिलियन डॉलरची कमाई करत होतो, तर माझे कर्मचारी केवळ ३० हजार डॉलरचीच कमाई करत होते'.