शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

"इथे खूप समाधान मिळतं"; सुंदर तरुणी करतेय कब्रस्तानात नोकरी, महिन्याला मिळतो एवढा पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:03 IST

22 वर्षीय टॅन स्वत:चे कब्रस्तानातले फोटो आणि व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत असते.

एका 22 वर्षीय तरुणीने चक्क कब्रस्तानात नोकरी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी ती साफसफाई आणि अंत्यसंस्काराशी संबंधित गोष्टी पाहते. या कामासाठी तिला महिन्याला 45,000 रुपये वेतनही मिळतं. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिचं काम असतं. तसेच आठवडयातून एक सुट्टीही मिळते. चीनमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे आडनाव टॅन असं आहे. 

22 वर्षीय टॅन स्वत:चे कब्रस्तानातले फोटो आणि व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत असते. तिचं असं म्हणणं आहे, की तिला या कामात मानसिक समाधान मिळतं. तसंच इथे सामान्यपणे ऑफिसमध्ये आढळणारं राजकारणदेखील नाही. टॅन आपल्या या कामाविषयी म्हणाली की, तिला तिचं वैयक्तिक आयुष्य आणि जॉब यात चांगला समतोल साधायचा होता. शांत वातावरणात काम करण्याची तिची इच्छा होती. तसंच तिला ऑफिसमधल्या धावपळीच्या आयुष्यापासून दूर राहायचं होतं. 

एखाद्या नैसर्गिक ठिकाणी किंवा निसर्गाच्या सानिध्यात तिला नोकरी करायची होती. यामुळेच तिने पश्चिम चीनच्या चोंगकिंगसारख्या डोंगराळ भागात ही कब्रस्तानातली नोकरी स्वीकारली. एका व्हिडिओत टॅन असं म्हणतेय की, हा जॉब खूप सोपा आणि आरामदायक आहे. इथं कुत्री, मांजरं आणि इंटरनेटही आहे. गमतीत ती स्वत:ला कब्रस्थानची राखणदार असल्याचं म्हणते.

महिन्याला कमावते 45 हजार रुपये

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, टॅन ही कब्रस्तानात काम करते. तिला मिळणारं मासिक वेतन हे 4000 युआन इतकं आहे. अर्थात, भारतीय चलनाप्रमाणे तिला महिन्याला 45,000 रुपये मिळतात. ती आठवड्याचे सहा दिवस काम करते. तिच्या ड्युटीची वेळ सकाळी 8:30 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तसंच दिवसाचे दोन तास तिला नाश्ता-जेवणासाठी सुट्टी मिळते.

टॅनच्या टिकटॉकवर व्हायरल झालेल्या व्हिडिओजवर नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, अशा ठिकाणी नोकरी करणं हे पूर्वी अशुभ मानलं जायचं, पण पुरोगामी किंवा पुढारलेल्या लोकांना हे काम करून मानसिक शांतता मिळते. दुसर्‍या एक युजरने म्हटलं आहे की, गरज आणि आवड ही माणसाला कुठलीही गोष्ट करायला भाग पाडते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके