जगभरात महिलांवरील अत्याचारांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. भारतासोबतच इतरही देशांमध्ये महिला असुरक्षित आहेत. महिला बलात्कार, जबरदस्ती लग्न, हत्या, शरीर विक्री या गोष्टींच्या शिकार होत आहेत. असाच एक गंभीर गुन्हा म्हणजे महिलांची तस्करी किंवा अपहरण. श्रीमंत देशातील लोक खासकरून अरबमधील शेख दुसऱ्या देशांमध्ये जाऊन तेथील गरीब मुलींशी लग्न करतात आणि त्यांना अरबला नेतात. याबदल्यात मुलींच्या आई-वडिलांना एक रक्कम दिली जाते. पण यात मुलीची मर्जी नसते.
scmp.com ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलींना आधीच धमकावलं जातं आणि तिच्यावर नजर ठेवली जाते. जेणेकरून कुठे तक्रार करू नये किंवा पळून जाऊ नये. असे गुन्हे तर भारतात सुद्धा होतात. अनेक मुली देहविक्रीच्या अंधारात ढकलल्या जातात. मुलींची तस्करी करण्याचा मुख्य मार्ग असतो विमान.
ही विमानाच्या माध्यमातून होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वीडन देशाने एक चांगली आयडिया शोधली आहे. याच्या माध्यमातून महिला त्यांची सुरक्षा करू शकतात.
काय दिलाय सल्ला?
स्वीडनमध्ये महिलांना अंडरगारमेंट्समध्ये चमचा लपवून ठेवण्याचा सल्ला दिला गेलाय. इथे मुलींचं जबदस्तीने लग्न करून त्यांना परदेशात घेऊन जाण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांना सांगण्यात आलं आहे की, त्यांनी अंडरगारमेंट्समध्ये धातुचा चमचा लपवून ठेवाव. जर त्यांनी असं केलं तर रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर चेकिंग दरम्यान त्या मेटल डिटेक्टरमध्ये पकडल्या जातील. अशात मुलींना वेगळ्या रूममध्ये नेऊन त्यांची तपासणी केली जाईल. तेव्हा त्या अधिकाऱ्यांना सगळं सांगू शकतील की, त्यांना जबरदस्तीने परदेशात नेलं जातंय.
महिलांसोबतच होणाऱ्या अत्याचारांविरोधात काम करणाऱ्या अधिकारी कतरिना इडगार्डने यांनी एअरपोर्ट अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, अशा स्थितीत त्यांनी काय कारवाई करावी.