शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 10 वर्षांच्या मुलीची कमाल, एका महिन्यात कमावले 1 कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 16:30 IST

Pixie Curtis : विशेष म्हणजे पिक्सीने गेल्या एका महिन्यातच एक कोटी 4 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

नवी दिल्ली : अवघ्या 10 वर्षांची मुलगी आपल्या खेळण्यांच्या व्यवसायातून एवढी कमाई करते की, ती वयाच्या 15 व्या वर्षीही आरामात रिटायरमेंट घेऊ शकते. दरम्यान, पिक्सी कर्टिस नावाच्या या मुलीला तिचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिची आई रॉक्सी यांनी खूप मदत केली आहे. विशेष म्हणजे पिक्सीने गेल्या एका महिन्यातच एक कोटी 4 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

'मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात राहणारी पिक्सी तिच्या आईसोबत फिजेट्स आणि रंगीबेरंगी पॉपिंग खेळणी बनवते. या खेळण्यांना मागणी एवढी आहे की, ती बाजारात लगेच विकली जात आहेत. याशिवाय, पिक्सीच्या नावावर एक हेअर ऍक्सेसरी ब्रँड देखील आहे, जो तिची आई रॉक्सी यांनी स्वतः बनवला आहे. यात अतिशय स्टाइलिश आणि सुंदर हेडबँड, क्लिप आणि इतर साहित्यांचा समावेश आहे.

पिक्सीची आई रॉक्सी यांनी एका मुलाखतीत सांगितले, "माझ्यासाठी सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे माझ्या मुलीमध्ये एवढ्या लहान वयात असलेली उद्योजकता आहे. तर ही प्रतिभा माझ्यात कधीच नव्हती. मलाही यशस्वी व्हायचे होते. पण माझ्या मुलीने इतक्या कमी वयात व्यवसाय यशस्वी करून माझे स्वप्न पूर्ण केले आहे."

ज्यावेळी मी स्वतः 14 वर्षांची होती, त्यावेळी ती मॅकडोनाल्डमध्ये काम करत होती. एखादा पगारदार माणूस जेवढे कमवू शकतो तेवढीच कमाई करत होती, असे रॉक्सी म्हणाल्या. तसेच, माझ्या मुलीमुळेच मला उद्योजक बनण्याची संधी मिळाली. माझ्या मुलीला एवढ्या लहान वयात ते सगळं मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे, जी मला आता मिळत आहे. आम्ही पिक्सीसाठी सर्व नियोजन केले आहे, जेणेकरून ती वयाच्या 15 व्या वर्षी रिटायरमेंट घेऊ शकेल, असेही रॉक्सी यांनी सांगितले.

दरम्यान, पिक्सी सध्या सिडनीतील एका प्राथमिक शाळेत शिकत आहे. पण या वयातही पिक्सी आणि तिच्या भावाकडे एक कोटी 40 लाख रुपयांची मर्सिडीज कार आहे. रॉक्सी यांनी सांगितले की, सिडनीमध्ये त्या आपली मुले आणि पती ऑलिव्हर कर्टिससह 49.72 दशलक्ष रुपयांच्या हवेलीत राहतात. 2012 मध्ये त्यांचे  ऑलिव्हरसोबत लग्न झाले होते.  रॉक्सी यांचे अनेक यशस्वी व्यवसाय आहेत.

टॅग्स :businessव्यवसायJara hatkeजरा हटके