शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

२०० वर्षांआधी रातोरात अचानक या गावातील सगळे लोक झाले होते गायब, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:57 IST

Ghost Village of India: कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

Ghost Village of India: राजस्थानचा इतिहास खूप मोठा आहे. येथील किल्ले-महाल आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत राहतात. पण येथील एक गाव वेगळ्याच कारणानं चर्चेत असतं. येथील कुलधरा हे एक असं गाव आहे जिथे एक अजब शांतता आहे. कुलधरा गावाला लोक 'भूताचं गाव'असंही म्हणतात. या गावातील लोक रोतरात 'गायब' झाले होते. चला तर जाणून घेऊ या गावाच्या रहस्याबाबत...

जयपूरजवळ कुलधरा कधीकाळी पालीवाल ब्राम्हणांचं एक समृद्ध गाव होतं. येथील लोक बुद्धिमान होते आणि त्यांना व्यापाराचं कौशल्य होतं. साधारण २०० वर्षांआदी कुलधरा आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील सगळे लोक रातोरात गायब झाले आणि याची त्यांनी काही खूणही सोडली नाही. या गावाच्या कहाणीमध्ये  एक स्थानिक शासक सलीम सिंहचा उल्लेख येतो. हा एका पालीवाली ब्राम्हणाच्या मुलीशी बळजबरीनं लग्न करण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, गावातील लोकांनी त्याला विरोध केला. असं म्हणतात की, तेव्हा त्यानं गाव नष्ट करण्याची धमकी दिली होती. गावातील लोक त्याच्यासमोर झुकले नाही आणि त्यांनी ठरवलं की, ते गाव सोडून जातील. असं सांगितलं जातं की, ते जाण्याआधी या गावाला शापित करून गेले होते.  जेणेकरून तिथे पुन्हा कुणी राहू नये. तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा वसलं नाही.

कुलधराच्या पडक्या घरांनी या गावाला आणखी रहस्यमय बनवलं आहे. इथं कोणतेच प्राणी नाही. जीवन नाही. झाडं नाहीत. फक्त भयान शांतता. काही लोक दावा करतात की, त्यांना इथे एक अजब ऊर्जा जाणवते. तर काही लोक म्हणतात की, हवेत इथे काही आवाजही ऐकायला मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही येथील दगडांच्या संरचना सुरक्षीत आहेत. 

अनेक लोक असंही मानतात की, कुलधरातील गायब झालेल्या लोकांची आत्मा अजूनही इथे भटकते. काही लोक दावा करतात की, रात्री इथून काही आवाज येतात. या गावाबाबत अनेक कथा प्रचलित असूनही इथे अनेक पर्यटक भेट देतात. येथील वास्तुकलेचं कौतुक करतात. तर काही लोक इथे वेगळा अनुभव घेण्यासाठी येतात. पण अजूनही या गावातील लोक कुठे गेले हे कुणाला समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स