शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कायच्या काय! घरात झुरळं पाळा अन् लाखो रुपये कमवा, कंपनीची अजब ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:30 IST

झुरळांचा नायनाट करण्यासाठी काय काय उपाय करतो. पण नकोशी वाटणारी हीच झुरळं घरात ठेवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळत असतील तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका कंपनीने तशी ऑफर दिली आहे.

घरात झुरळ असणं कुणालाच आवडणार नाही. घरात झुरळं असणं म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधीचं संकेत. त्यामुळे एक जरी झुरळ दिसलं तरी त्याची आपण पाठ सोडत नाही. झुरळांचा नायनाट करण्यासाठी काय काय उपाय करतो. पण नकोशी वाटणारी हीच झुरळं घरात ठेवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळत असतील तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका कंपनीने तशी ऑफर दिली आहे. घरात झुरळं पाळण्यासाठी ही कंपनी घरमालकाला चक्क दीड लाख रुपये देत आहे.

अमेरिकेतील एका पेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीनेही ही ऑफर दिली आहे (American Company Research on Cockroaches). ही कंपनी उत्तर कॅरोलिनाकत आहे. या कंपनीला कॉकरोच नष्ट करणाऱ्या एका औषधावर अभ्यास करायचा आहे. कंपनीने तयार केलेलं औषध कॉकरोचवर किती प्रभावी ठरत आहे, हे कंपनीला जाणून घ्यायचं आहे.  त्यासाठी कंपनीने आपल्या वेबसाईटवर पोस्ट करत जे लोक आपल्या घरात कॉकरोज ठेवण्याची परवानगी देतील त्यांना पैसे दिले जातील असं म्हटलं आहे.

ही कंपनी घरात जवळपास 100 कॉकरोच सोडेल. यासाठी त्या घराच्या मालकाला 2,000  डॉलर्स म्हणजे जवळपास दीड लाख रुपये देईल. कंपनीला अशी 5-6 घरं हवी आहेत. कंपनीची ही चाचणी जवळपास एक महिना सुरू राहिल. कॉकरोच हटवण्यासाठी कंपनीने पेस्ट कंट्रोल प्रोफेशनल्सना पाठवेल.

रिपोर्टनुसार यासाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. घर अमेरिकेत असायला हवं. घरमालकाचं वय कमीत कमी 21 वर्षे असायला हवं आणि घरमालकाने या टेस्टसाठी आपली लिखित परवानगी द्यायला हवी. 30 दिवसांच्या कालावधीत घरमालाका कोणत्याही इतर पेस्ट कंट्रोलचा वापर करण्याची परवानगी नसेल. जर 30 दिवसांत कंपनी नव्या पद्धतीने झुरळांचा नायनाट करू शकली नाही तर इतर पर्यायांनी ती झुरळांचा नाश करेल.

ही ऑफर फक्त अमेरिकेत घर असलेल्यांसाठी मर्यादित असली तरी जर तुम्हालाही अशी ऑफर मिळाली तर तुम्हाला तुमच्या घरात झुरळं ठेवायला आवडेल की नाही, तुम्ही यासाठी तयार आहात की नाही हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके