शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वाहन परवाना मिळवला अन् अवघ्या ४९ मिनिटांत गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 16:16 IST

वाहन परवाना मिळाल्याचा आनंद काही मिनिटंच टिकला

बर्लिन: एक तरुण वाहतूक पोलिसांच्या चाचणीत उत्तीर्ण झाला. मात्र अवघ्या तासभराच्या आत त्याला वाहन परवाना गमवावा लागला. जर्मनीच्या हेमेरे भागात ही घटना घडली आहे. १८ वर्षांचा तरुण वाहन परवाना मिळाल्यानंतर घरी परतत होता. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी अडवली आणि नियमभंग केल्याबद्दल दंडदेखील वसूल केला. याशिवाय त्याचा परवानादेखील रद्द केला. हेमेरमध्ये राहणारा १८ वर्षांचा तरुण वाहन परवाना चाचणी देऊन घरी परतत होता. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानं त्याला वाहतूक पोलिसांनी परवानादेखील दिला होता. मात्र वाहन परवाना मिळाल्यानं त्याला झालेला आनंद अवघी काही मिनिटंच टिकला. घरी जात असताना या तरुणाची गाडी वाहतूक पोलिसांनी अडवली आणि स्पीड गनच्या मदतीनं त्याच्या गाडीचा वेग तपासला. यामध्ये त्यानं दोनवेळा गाडी मर्यादेपक्षा अधिक वेगानं चालवल्याचं दिसून आलं. तरुणानं ६० मैल प्रति तास वेगमर्यादा असलेल्या भागातून ९५ मैल प्रति तास वेगानं गाडी चालवली होती. तर ३० मैल प्रति तास वेगमर्यादा असलेल्या क्षेत्रातून ५० मैल प्रति तास वेगानं गाडी पळवली होती.तरुणानं केलेल्या वेगमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल पोलिसांनी त्याच्याकडून २०० युरोजचा दंड वसूल केला. यासोबतच त्याचा वाहन परवानादेखील काढून घेतला. चार आठवड्यानंतर त्याला हा परवाना परत देण्यात येईल. 'काही गोष्टी कायमस्वरुपी टिकतात. तर काही तासभरदेखील टिकत नाहीत,' असं पोलिसांनी त्याच्या दंडाच्या पावतीवर लिहिलं. तरुण मुलासोबत गाडीत त्याचे चार मित्र होते. वाहन परवाना मिळाल्यानं मित्रांना आपलं वाहन चालवण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी तरुणानं कार वेगात चालवली असावी, अशी शक्यता विभागीय पोलीस अधिकारी मार्कशर क्राईस यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसGermanyजर्मनी