शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाणी घुबडांनी थाटला फ्लॅटमध्ये संसार; झाडेच नाहीत तर घरटी करणार कुठे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:36 IST

दौंड येथील एनव्हायरमेंटल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक नचिकेत अवधानी यांनी या घुबडांची सुटका केली.

श्रीकिशन काळेपुणे : पक्ष्यांची घरटी असणारी झाडे नष्ट करून त्या ठिकाणी मानवासाठी घरे बांधली जात आहेत. पक्ष्यांचे घर नष्ट झाल्याने गव्हाणी घुबडांनी चक्क एका फ्लॅटमध्ये आसरा घेऊन संसार थाटला.  दोन वर्षांपासून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये चक्क चार घरटी दिसून आली. त्यात ८ गव्हाणी घुबडे होती. त्यांना वन विभागाच्या रेस्क्यू सेंटरमध्ये हलविले.

दौंड येथील एनव्हायरमेंटल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक नचिकेत अवधानी यांनी या घुबडांची सुटका केली. ते म्हणाले,‘‘ चौफुला केडगाव रोड जवळील ‘समृद्धी एन्क्लेव्ह’ या सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये मालक राहण्यासाठी तेथे येणार होते. तत्पूर्वी पाहणी केली असता घुबडाची चार घरटी व आठ घुबडे दिसली. त्यातील दोन घरटी वापरातील होती, तर बाकी दोन घरट्यातील पिल्लांनी नुकतेच घरटे सोडले असावे.  घुबडाची एवढी मोठी संख्या मनुष्यवस्तीजवळ बघण्याची आमची ही पहिलीच वेळ होती.’’

आठपैकी एकाला अधिवासात सोडले एकूण ८ गव्हाणी घबडांना वाचवून हा संघर्ष तात्पुरता थांबवला.  ८ पैकी १ गव्हाणी घुबड हे पूर्ण वाढ झालेले होते, त्याला त्याच्या मूळ अधिवासात परत मुक्त केले व ७ छोट्या पिलांना  दौंड तालुक्याच्या ‘रेस्क्यू’ वाइल्ड लाईफ ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पाठविण्यात आले. 

वृक्षांचे संवर्धन गरजेचे केडगाव भागात जवळपास मोठे देशी वृक्ष दिसत नव्हते. गव्हाणी घुबड हे जास्त करून जुन्या झाडांच्या ढोलीत घर करतात. रस्ता रुंदीकरणात किंवा केडगावचा  विकास करताना  मोठी झाडे तोडली गेली व अशा घुबडांना राहण्यासाठी लागणारी जागा आपण नष्ट केली.  त्यामुळे या गव्हाणी घुबडांनी या फ्लॅटचा वापर केला.  म्हणून जुन्या देशी वृक्षाचे जतन करणे खूप महत्त्वाचे आहे, असे नचिकेत अवधानी यांनी सांगितले.