शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भापासून आतापर्यंत...३१ वर्ष दररोज मुलाचा फोटो काढतात वडील; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 11:05 IST

कॉरीचा जन्म १९९१ मध्ये झाला. कॉरी घराबाहेर कुठे गेला तरी इयान त्याचा फोटो काढण्यासाठीत अनेक किमी प्रवास करतात.

एक व्यक्ती गेल्या ३ दशकांपासून दररोज स्वत:च्या मुलाचा फोटो घेत होता. जेव्हा हा मुलगा आईच्या गर्भात होता तेव्हापासून तो असं करतोय. हा व्यक्ती असं का करत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र मुलाचा फोटो घेण्यामागचं या व्यक्तीनं सांगितलेले कारण ऐकून कुणीही हैराण होईल. इंग्लंडमध्ये राहणारा ६६ वर्षीय इयान मकलियोड गेल्या ३१ वर्षापासून मुलगा कॉरी मकलियोड याचे फोटो घेतायेत. 

कॉरीचा जन्म १९९१ मध्ये झाला. कॉरी घराबाहेर कुठे गेला तरी इयान त्याचा फोटो काढण्यासाठीत अनेक किमी प्रवास करतात. मोबाईल फोनच्या जमान्यात हे काम खूप सोपे झाले. कॉलेजच्या दिवसात आणि त्यानंतरही कॉरी सेल्फी क्लिक करून त्याच्या वडिलांना फोटो पाठवायचा. फॉक्स न्यूज रिपोर्टनुसार, कॉरीने सांगितले की, माझे वडील इयान यांना १९९१ पासून दरदिवशी माझा फोटो घेण्याची आयडिया आली. त्यावेळी ते वाइन पित होते. ही गोष्ट इंटरनेटच्या पहिल्यापासून सुरू आहे. सुरुवातीला काही वर्ष हे फोटो घेऊन त्याचे फोटो कॉपी बुक बनवतील असा विचार इयान यांच्या मनात आला. 

इयान यांचे तेव्हापासून एक छोटसं आर्ट प्रोजेक्ट आहे परंतु जेव्हा त्यांनी फोटो घ्यायला सुरु केलं तेव्हापासून ही सवय कायम राहिली. माझे वडील क्रिएटिव्ह आहेत असं कॉरीनं म्हटलं. त्याचसोबत जर मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तरी मध्यरात्रीही माझा फोटो घेण्यासाठी तिथे यायचे. मला त्रास व्हायचा. मी शाळेच्या पिकनिकला गेलो तिथे टिचरला माझा फोटो घेण्यास सांगितले. आतापर्यंत या फोटोंची संख्या ११ हजाराहून अधिक झालीय असं कॉरीनं सांगितले. कॉरी सध्या जगभ्रमंती करतोय. ६० हून अधिक देशात त्याने प्रवास केला. यूट्यब आल्यानंतर या प्रोजेक्टला एक टाइम लॅप्स फिल्म बनवण्यात आले. एकदा कॅमेरा खराब झाला, एकदा चोरीला गेला. त्यामुळे अनेक फोटो गायब झाले. 

का घ्यायचे दररोज फोटो?इयान मकलियोड यांनी म्हटलं की, मी जर दरदिवशी मुलाचा फोटो घेतला तर काय होईल? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास पाहणे किती अचंबित करणारा आहे. मी हे काम अखेरपर्यंत करणार आहे. कॉरीच्या जन्मापासूनच मी रोज फोटो घेण्याचा निर्णय घेतला होता. मला माहिती नाही हे मी किती दिवस करू शकेन. कदाचित आणखी काही वर्ष...परंतु ज्यादिवशी काम थांबवायला लागेल तो दिवस कठीण असेल. फोटोबद्दल माझे काही नियम आहेत. मी दुपारी १२ ते रात्री १२ या काळातला फोटो घेतो. जर मध्यरात्रीनंतर वेळ झाला आणि मी योग्यस्थळी पोहचलो नाही तर २४ तासाचा कालवधी उलटतो. त्यामुळे फोटो खराब होतो असं त्यांनी सांगितले.