शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ब्रिटनमध्ये आढळली बेडकांची स्मशानभूमी; शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणी आढळले तब्बल 8000 हाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 17:06 IST

Viral News: पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात अनेक अवशेष मिळतात. पण, केंब्रिजमधील उत्खननात शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणाहून बेडकांची 8000 हाडे सापडली आहेत.

Viral News: ब्रिटनमधील केंब्रिजजवळ शास्त्रज्ञांना एक धक्कादायक गोष्ट सापडली आहे. येथील बार हिलवर रस्त्याच्या कडेला केलेल्या उत्खननादरम्यान शास्त्रज्ञांना 8,000 प्राचीन टॉड आणि बेडकांची हाडे सापडली आहेत. 2016-2018 दरम्यान लोहयुगात बांधलेल्या घराजवळ हे उत्खनन झाले. यादरम्यान 14 मीटर लांब आणि 6 फूट खोल खड्ड्यात ही हाडे सापडली. बेडकांच्या या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांना एक मीटर वरची माती आणि सबसॉईल खणून काढावी लागली. एकाच ठिकाणी इतके अवशेष सापडणे ही एक असामान्य आणि विलक्षण शोध आहे. बेडकांच्या हाडांचे गूढ रहस्यम्युझियम ऑफ लंडन आर्किओलॉजी-एमओएलएचे वरिष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ विकी इवेन्स म्हणतात की, लंडनमधील अनेक साइट्सवर काम करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात बेडूक कुठेही आढळले नाहीत. एकाच खड्ड्यातून एवढी हाडे मिळणे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही हाडे मुख्यतः बेडूक आणि टॉडची आहेत. अश्मयुगात अनेकजण बेडूक खात असत. मात्र, खड्ड्यात सापडलेल्या हाडांवर कोणतेही कापलेले किंवा जळण्याचे चिन्ह दिसले नाही. त्यामुळे लोकांनी हे बेडूक खाल्ले असे म्हणता येणार नाही. मात्र, बेडूक उकडले असते तरी त्याच्या खुणा सापडल्या असत्या.

या घटनेमागे अनेक सिद्धांत जिथून हे अवशेष सापडले, तेथे जळलेल्या धान्याचे पुरावे मिळाले आहेत. यावरुन काही असे म्हणत आहेत की, त्या काळात लोक एकाच ठिकाणी पिक ठेवत असत. पिकांमुळे इतर कीटक तिथे आले असावेत आणि बेडूक त्यांना खायला आले असावेत. प्रागैतिहासिक काळातील बेडकांच्या या अवशेषामागे आणखी एक सिद्धांत दिला जातोय. तो म्हणजे, बेडूक प्रजनन करण्यासाठी या भागात आले असावेत आणि खड्ड्यात पडून अडकले असतील. कडाक्याच्या थंडीमुळे या बेडकांचा इथेच मृत्यू झाला असावा. बेडकांमध्ये काही रोग झाल्यामुळे असे घडले असावे असाही एक सिद्धांत आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय