ब्रिटनमधील एका ४ वर्षीय मुलीनं डायनासोरच्या पायाचा ठसा शोधून काढला आहे. वेल्समधील एका समुद्र किनाऱ्यावर मुलीला डायनासोरच्या पायाचा ठसा आढळून आला. गेल्या दशकभरात ब्रिटनमध्ये डायनासोरच्या पायाचा इतका स्पष्ट ठसा आढळून आलेला नव्हता. डायनासोरच्या पावलाचा ठसा शोधणाऱ्या मुलीचं नाव लिली वायल्डर असं आहे. लिलीनं शोधलेल्या ठशावर आता संशोधक पुढील संधोशन करतील. लिलीनं शोधून काढलेला ठसा २२० मिलियन वर्षे जुना आहे.आता मृत लोकांसोबतही करता येणार चॅटींग, विचित्र वाटत असलं तरी हे खरंच होणार आहे...दक्षिण वेल्समधील बॅरी परिसरात असलेल्या समुद्र किनाऱ्याजवळ चालत असताना लिली वायल्डरला १० सेटिंमीटरचा पावलाचा ठसा दिसला. या डायनासोरची उंची ७५ सेंटिमीटर आणि लांबी अडीच मीटर असावी, असा अंदाज आहे. हा डायनासोर दोन पायांवर चालणारा होता आणि तो लहान मोठे किटक खायचा असं वृत्त द इंडिपेंडंटनं दिलं आहे. वेल्स संग्रहालयानं लिलीनं शोधलेल्या पावलाच्या ठशाचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे.
चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 18:54 IST