शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षाच्या मुलाने क्लासमधील मुलीला गिफ्ट दिले दोन सोन्याचे बिस्कीट आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 10:32 IST

एका चार वर्षाच्या मुलाने सगळ्यांनाच हैराण केलं. त्याने त्याच्या किंडरगार्टनमधील एका मैत्रिणीला गिफ्ट म्हणून 20 तोळे सोनं दिलं.

Gold Biscuits :  लहान मुलांच्या मैत्रीबाबत तुम्ही अनेक मजेदार आणि क्यूट गोष्टी ऐकल्या असतील. त्यांचं निरागस वागणं आणि बोलण ऐकत दिवस कसा निघून जातो कळतच नाही. पण कधी कधी ही लहान मुले असं काही करून जातात ज्याची कल्पनाही आपण करत नाही. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. लहान मुले आपली खेळणी, पेन्सील, चॉकलेट-बिस्कीट मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करतात. पण चीनमध्ये एका चार वर्षाच्या मुलाने सगळ्यांनाच हैराण केलं. त्याने त्याच्या किंडरगार्टनमधील एका मैत्रिणीला गिफ्ट म्हणून 20 तोळे सोनं दिलं.

बसला ना धक्का...20 तोळे सोनं म्हणजे दोन सोन्याची बिस्कीटे. इतकं सोनं मुलाने आपल्या मैत्रिणीला गिफ्ट दिलं. दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टनुसार, ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतात झाला. इथे किंडरगार्टनमध्ये एक छोटा मुलगा आपल्या मैत्रिणीच्या इतका प्रेमात पडला की, तो तिच्यासोबत जीवन जगण्याची स्वप्ने बघू लागला. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या घरातील दोन सोन्याची बिस्कीटे घेऊन आला. दोन्ही बिस्कीटे 100-100 ग्राम चे आहेत. मुलगी जेव्हा ही बिस्कीटे घरी घेऊन गेली आणि आई-वडिलांना दाखवली तर ते हैराण झाले.

यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी लगेच मुलाच्या आई-वडिलांना संपर्क केला आणि याबाबत सांगितलं. मुलाच्या आई-वडिलांनी मोकळेपणाने सांगितलं की, त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, हे सोन्याचे बिस्कीट त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी ठेवले आहेत. पण त्यांना याची कल्पना कल्पना नव्हती की, त्यांचा मुलगा हे सोन्याचे बिस्कीट न सांगता मुलीला देईल. या घटनेची सोशल मीडियावर आता चर्चा होत आहे. लहान मुलांना गिफ्ट देणं चांगलं नक्कीच आहे, पण त्यांचं महत्वही त्यांना सांगायला हवं. त्यांना शिकवायला हवं की, महागड्या वस्तू किंवा कोणत्याही वस्तू कुणालाही न विचारता अशा द्यायच्या नसतात. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके