शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'या' फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चाललेला प्रकार पाहुन तुम्हालाही बसेल धक्का, जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 19:40 IST

ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला जायला आवडतं किवा तिथं जाण्याचं स्वप्न तुम्ही पाहात आहात. त्या हॉटेलमध्ये प्रत्यक्षात काय आणि कसं शिजतं हे तुम्ही कधी पाहिलं आहे का?

फाइव्ह स्टार हॉटेल म्हटलं की हे बेस्टच असेल असं वाटतं. त्यामुळे बरेच लोक डोळे झाकून या हॉटेलवर विश्वास ठेवतात.  भले जास्त पैसे द्यावे लागत असतील पण किमान तिथं स्वच्छता राखली जाते, सुरक्षित अन्नपदार्थ खायला मिळतात आणि उत्तम सेवाही मिळते, असा दिलासा असतो. त्यामुळे काही लोक तर फाइव्ह स्टार हॉटेलशिवाय दुसऱ्या कोणत्या हॉटेलमध्ये खाणंपिणं करतच नाही. पण अशाच एका फाइव्ह स्टार हॉटेलचं डर्टी सिक्रेटचा उलगडा झाला आहे  .

ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला जायला आवडतं किवा तिथं जाण्याचं स्वप्न तुम्ही पाहात आहात. त्या हॉटेलमध्ये प्रत्यक्षात काय आणि कसं शिजतं हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? यूकेतील अशाच एका प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

समुद्रकिनारी असलेलं यूकेतील ब्लॅकपूलमधील नॉर्थ शोर हॉटेल (North Shore Hotel). गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फूड स्टँडर्ड एजन्सी या हॉटेलबाबत  बऱ्याच तक्रारी आल्या. त्यामुळे या हॉटेलवर एजन्सीने  अचानक छापा मारला. त्यानंतर जे दिसलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. Lanc Live च्या रिपोर्टनुसार या हॉटेलचं किचन अतिशय अस्वच्छ होतं. इतर स्वच्छताही राखली जात नव्हती.

इथं अशा अनेक वस्तू होत्या ज्या एक्सपायर झाल्या होत्या. त्यापासूनच खराब पदार्थ साठवून त्यापासून  खाद्यपदार्थ बनवले जात होते. सॉसच्या बाटल्या खराब झाल्या होत्या. किचनमध्ये गरम पाण्याची व्यवस्था नव्हती. याचा अर्थ कर्मचारी आपले हात थंड पाण्यानेच धुवून काम करत होते.

तपासानंतर हे हॉटेल लगेच सील करण्यात आलं आहे. आता हे हॉटेल बंद आहे. इतक्या मोठ्या हॉटेलचा असा हलगर्जीपणा पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. भले हे प्रकरण यूकेतील असेल. तरी आपण ज्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो तिथंही अशी परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध राहा आणि काळजी घ्या.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके