शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! लग्नाच्या दिवशी बदलली नवरी, नवरदेवाने विचारलं तर म्हणाले, मेकअपने तसं वाटत असेल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 11:47 IST

वेगवेगळ्या सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या वेळेवर नवरी बदलण्यात येते आणि जेव्हा नवरदेवाला याची माहिती मिळते तेव्हा एकच गोंधळ उडतो.

वेगवेगळ्या सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या वेळेवर नवरी बदलण्यात येते आणि जेव्हा नवरदेवाला याची माहिती मिळते तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात वेळेवर नवरीच बदलून टाकल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. भिंड येथील परमाल सिंग बैसांदरने त्याच्या मुलीचं लग्न बढपुरा येथील तरूण रूपेंद्र तिवारीसोबत ठरवलं होतं. मुलगी पसंत आल्यावर साखरपुडा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता. 

पण १६ जानेवारीला एका रिवाजावेळी मुलगीच बदलून टाकली आणि तिच्या जागेवर कोलकातामधील एका तरूणीला नवरीचे कपडे घालून बसवलं. तरूणाच्या घरच्यांना मुलगी बदलल्याचा संशय आला आणि तशी शंका त्यांनी मुलीच्या वडिलांकडे बोलून दाखवली.

यावर मुलीचे वडील परमाल बैसांदर इतर काही लोकांनी सांगितले की, मेकअपमुळे मुलीचा चेहरा बदललेला दिसत असेल. यावर तरूणाने विश्वास ठेवला आणि तो विषय तिथेच संपवला.

लग्नानंतर जेव्हा नवरी सासरी पोहोचली तेव्हा खुलासा झाला की, रूपेंद्रचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत लावून देण्यात आलं. त्यानंतर तरूणाच्या कुटूंबीयांनी पोलिसांना ही घटना सांगितली. पोलीस लगेच मुलीच्या घरी गेले तेव्हा सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके