शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!
2
ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!
3
गतविजेत्या इंग्लंडला धक्का! युरोपियन संघाविरुद्ध T20 World Cup मध्ये विजयाची पाटी कोरीच
4
अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का
5
महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले
6
"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया
7
कर्णधाराने कॅच सोडली, नेपाळने मॅच गमावली! नेदरलँड्सचा रोमहर्षक विजय, मॅक्स ओ'डोडचा तडाखा
8
"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  
9
Rohit एकटा भिडला, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पराक्रम केला; नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा वर्चस्मा 
10
“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
11
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...
12
"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
13
बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  
14
Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
15
Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य
16
Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले
17
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
18
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
20
ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?

चोर समजून कामगारांना बदडले

By admin | Published: December 29, 2014 5:16 AM

गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले

भिवंडी : गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या त्यांच्या सात साथीदारांनादेखील गावातील तरुणांनी बांबू, लाठ्या-काठ्यांनी बदडले. या प्रकरणी २४ ग्रामस्थांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागात चोर शिरतात, अशा अफवा तालुक्यात पसरल्या आहेत. यासंदर्भात कोणतीही खात्री करून न घेता ओवळी गावात ११ कामगारांना मारल्याची घटना घडली. तालुक्यातील गोदामात काम करून समूहाने वळपाड्यात भाड्याने राहणारे श्रीकांत आहीर, माणिक बागुल, सोरम मंडल, रूपल आहीर हे चौघे पश्चिम बंगालचे कामगार घरी परतत होते. सुटी असल्याने शुक्रवारी सायंकाळी ओवळी गावातून फिरत गेले. त्या वेळी गावातील तरुणांनी त्यांना हटकले असता भाषा न समजल्याने घाबरून ते आपल्या घराच्या दिशेने पळू लागले. त्यामुळे गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी त्यांना मारहाण केली. या चौघांबरोबर वळपाड्यात राहणाऱ्या सात जणांना खोलीबाहेर काढून ठोशा-बुक्क्यांनी व लाठीकाठीने मारहाण केली. हे सर्व कामगार ‘ग्लोबल कम्पाउंड’मधील ‘सहानुभूती एंटरप्रायझेस’मध्ये काम करीत आहेत. पोलिसांनी ओवळी गावातील २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करीत नऊ जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)