शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

तिच्यासाठी 'ती' बनली 'तो'; कोणालाच आली नाही शंका; सत्य समजताच सगळ्यांना धक्का

By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 6:12 PM

समलैंगिक संबंध लपवण्यासाठी वेषांतर; एका भांडणामुळे भांड फुटलं

मुलगा म्हणून वावरणारा, कामाला जाणारा 'तो' प्रत्यक्षात 'ती' आहे याची जराशीदेखील शंका आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांना आली नाही. आपल्या शेजारी एक तरुण आणि एक तरुणी राहत असल्याचं सगळ्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्या घरात दोन तरुणी राहत होत्या. अखेर एके दिवशी सत्य समोर आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशतल्या मिर्झापूरमध्ये हा प्रकार घडला आहे.मिर्झापूरमध्ये समलैंगिक संबंधाची एक वेगळीच कहाणी समोर आली आहे. लखनऊमध्ये दोन तरुणींची घरं जवळजवळ होती. दोघींची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र घरचे ऐकणार नाहीत, समाजाचा विरोध होणार, याची कल्पना असल्यानं दोघींनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघी मिर्झापूर जिल्ह्यातल्या अहरौरा परिसरात एक घर भाड्यानं घेऊन राहू लागल्या.दोन तरुण मुली एक राहत असल्याचं कोणालाही कळू नये यासाठी एकीनं पुरुषांसारखे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. घर मिळाल्यानंतर घर चालवण्यासाठी नोकरी गरजेची होती. त्यामुळे तरुण बनलेली तरुणी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करू लागली. तरुणी अगदी व्यवस्थितपणे पुरुषांसारखी चालत-बोलत-वागत असल्यानं कोणालाही शंका आली नाही. घरात राहणाऱ्या तरुणीनं नोकरीस जाणाऱ्या तरुणीची ओळख शेजारच्यांना आपला मित्र म्हणून करून दिली.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गायब होताच त्यांच्या कुटुंबियांनी याची माहिती पोलीस ठाण्यात दिली होती. पळून गेलेली एक तरुणी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात होती. मात्र दुसऱ्या तरुणीला ही बाब खटकली. त्यावरून त्यांचं भांडण झालं. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि दोघींचं पितळ उघडं पडलं. आता पोलिसांनी दोन्ही तरुणींना त्यांच्या कुटुंबाकडे सोपवलं आहे. या प्रकरणाचा उलगडा होताच तरुणीच्या शेजारच्यांना मोठा धक्का बसला.