शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:54 IST

Elephant teeth Price : काही लोक यांचा वापर सजावटीसाठी करतात तर काही लोक यापासून दागिने बनवतात. हत्तीच्या दातांपासून तयार केलेल्या बांगड्या आणि काही गळ्यातील दानिने फार लोकप्रिय आहेत.

Elephant teeth Price : हस्तीदंताबाबत तर तुम्ही अनेकदा खूपकाही ऐकलं असेल, जगभरात हत्तीच्या दातांना खूप मागणी असते. ज्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, हस्तीदंताची जगभरात इतकी डिमांड का असते? अनेक लोक हस्तीदंताची तस्करी करतात आणि यामुळे दरवर्षी अनेक हत्ती मारले जातात. 

काही लोक यांचा वापर सजावटीसाठी करतात तर काही लोक यापासून दागिने बनवतात. हत्तीच्या दातांपासून तयार केलेल्या बांगड्या आणि काही गळ्यातील दानिने फार लोकप्रिय आहेत. पण याची किंमत इतकी जास्त का असते याचा तुम्हाला कधीना कधी प्रश्न पडला असेलच. 

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, यात इतकं काय खास आहे आणि या हस्तीदंताची किंमत इतकी का जास्त असते. त्यासोबत हस्तीदंताबाबत काही खास बाबीही सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्ही हैराण व्हाल.

मुळात हस्तीदंताचं काही आंतरिक मूल्य नाहीये. म्हणजे यात असं कोणतही तत्व नाही, ज्यामुळे ते इतकं खास मानलं जातं. याचं सांस्कृतिक मूल्य जास्त आहे. म्हणजे हस्तीदंताला श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच ज्यांच्याकडे हे असेल ते श्रीमंत आहेत. कारण जास्तीत जास्त राजांच्या घरात हे बघितले गेले आहेत. त्यामुळे याची किंमत जास्त मानली जाते.

किती रूपये किलो?

जर किंमतीबाबत सांगायचं तर याची काही अशी एक फिक्स किंमत नाही. पण हे नक्की आहे की, हे महागडं आहे. काही वर्षाआधी पश्चिम बंगालमध्ये 17किलो हस्तीदंताची तस्करी पकडण्यात आली होती. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साधारण 1 कोटी 70 लाख रूपये अंदाजे ठरवण्यात आली होती. म्हणजे यावरून अंदाज लावून शकता की, हस्तीदंताची एका किलोची किंमत 10 लाख रूपये असू शकते. 

एक्‍सपर्टनुसार, हस्तीदंताचा जास्त वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. गळ्यातील हार, बांगड्या, शर्टचे बटन यापासून तयार केले जातात. खासकरून श्रीमंत परिवारांमध्ये याची जास्त डिमांड असते. 

जुन्या काळात राजघराण्यांमध्ये याला खूप डिमांड होती. हिंदू लोकांमध्ये हत्तीच्या मुखाला गणेशाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे लोक हस्तीदंत घरात ठेवणं पसंत करत होते. पण हळूहळू हे इतकं वीभत्‍स झालं की, हत्तींचा यासाठी जीव घेतला जाऊ लागला. अनेक देशांमध्ये हत्तीचे दात काढण्यावर बंदी आहे. पण तरीही काही लोक त्यांचा जीव घेऊन दातांची तस्करी करतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके