शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Video: ग्रेट भेट! 30 वर्षांनंतरही हत्तिणीनं काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बरोब्बर ओळखलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:13 IST

हत्तीण आणि कर्मचाऱ्याच्या भेटीनं उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

बर्लिन: माणसं माणसांना विसरतात. काळजी घेणारी माणसं विस्मरणात जातात, असं म्हटलं जातं. मात्र प्राणी कधीच कोणाला विसरत नाही. आपलं कोण, परकं कोण ते त्यांच्या अगदी नीट लक्षात राहतं. याच गोष्टीची प्रचिती देणारी एक घटना जर्मनीत घडली. प्राणी संग्रहालयाचा कर्मचारी आणि हत्तिणीची तब्बल तीन दशकांनंतर भेट झाली. विशेष म्हणजे तीन दशकांनंतरही हत्तिणीनं क्षणार्धात कर्मचाऱ्याला ओळखलं. ही ग्रेट भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेला विषय ठरली आहे. स्कॉटलंडमधल्या ग्लास्गोतल्या प्राणीसंग्रहालयात 1970, 1980 च्या दशकात काम केलेल्या पीटर अ‍ॅडमसन यांनी किर्स्टी नावाच्या हत्तिणीची नुकतीच भेट घेतली. अ‍ॅडमसन कॅल्डरपार्क प्राणीसंग्रहालयात काम करायचे. त्यावेळी किर्स्टीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पुढे 1987 मध्ये किर्स्टीला इंग्लंडच्या वायव्येला असलेल्या चेस्टरमध्ये हलवण्यात आलं. तिथे तिची भेट ज्युडी नावाच्या हत्तिणीशी झाली. त्यानंतर या दोघींना डब्लिनला स्थलांतरित करण्यात आलं. 1994 ते 2005 या कालावधीत किर्स्टी ज्युडीसह डब्लिनलमध्ये राहत होती. यानंतर त्या दोघींना जर्मनीच्या सारलँडमध्ये हलवण्यात आलं. किर्स्टीनं स्कॉटलंड सोडल्यावर अ‍ॅडमसन यांचा तिच्याशी असलेला संपर्क तुटला. मात्र काही वर्षांनंतर अ‍ॅडमसन यांनी किर्स्टीचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्राणीसंग्रहालयांमध्ये मिळालेल्या माहितीनंतर ती जर्मनीत असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी जर्मनीला जाऊन किर्स्टीची भेट घेतली. किर्स्टी बराच काळ अ‍ॅडमसन यांना बिलगून होती. हत्ती कधीही कोणतीही गोष्ट विसरत नाही याची प्रचिती आल्याची भावना या भेटीनंतर अ‍ॅडमसन यांनी व्यक्त केली. 'किर्स्टीनं मला जवळ येऊ दिलं. तो क्षण मला भावुक करून गेला. ही भेट कायम माझ्या स्मरणात राहील,' अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.