जीना इसी का नाम है... ९० वर्षांच्या आजोबांनी दिला जगण्याचा कानमंत्र, या वयातही करतात थक्क करणारी कामं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:43 PM2020-05-18T15:43:50+5:302020-05-18T15:47:52+5:30

९० वर्षांच्या आजोबांची कृती इतरासांठी प्रेरणायी ठरत आहेत. हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न ते करत आहेत.

during lockdown you can learn life lesson from this 90 year old man-SRJ | जीना इसी का नाम है... ९० वर्षांच्या आजोबांनी दिला जगण्याचा कानमंत्र, या वयातही करतात थक्क करणारी कामं

जीना इसी का नाम है... ९० वर्षांच्या आजोबांनी दिला जगण्याचा कानमंत्र, या वयातही करतात थक्क करणारी कामं

Next

कोरोनामुळे सगळीकडेच नैराश्य पसरले आहे, बघावं तिथे कोरोनाने विळखा घातला आहे. दिवसाची सुरुवातच कोरोनापासून होते, त्यामुळे कोरोना आपल्या आयुष्यातील एक भाग बनत चालला आहे. त्यात लॉकडाऊनमुळे जनताही आपापल्या घरातच बंदिस्त असल्याने त्यांना आणखीनच नैराश्य आले आहे. नैराश्यात अनेकांनी तर आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मात्र, एका ९० वर्षांच्या आजोबांची कृती इतरासांठी प्रेरणायी ठरत आहेत. हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न ते करत आहेत. 

जीवनात कितीही कठीण क्षण आले तरी खचून जाऊ नका, सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक जीवन असे मानणारे आजोबा सध्या सोशल मीडियावर तुफान हिट ठरत आहेत. ह्युमन्स ऑफ बॉम्बेने याची दखल घेत या आजोबांची कहाणी जगासामोर आणली आहे. लॉकडाऊनकाळात अनेकजण आपले मन रमवण्यासाठी विविध गोष्टी करत आहेत. अगदी त्याचप्रमाणे आजोबा देखील त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करत स्वतःला व्यस्त ठेवत आहेत. सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे काय अशा गोष्टी आजोबा त्यांच्या उतारवयात शिकत आहेत. 

सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय आहे ते विनोदी मिम्स हे त्यांना कळले. त्यानुसार त्यांनीदेखील विनोदी मिम्स बनवायला सुरूवात केली आणि त्यांच्या फॅमिली ग्रुपवर ते नातेवाईकांसह शेअर करत त्यांचेदेखील मनोरंजन करत आहेत. 

आजोबा सांगतात, आपण आपल्या आय़ुष्याचा खूप विचार करतो. त्यामुळे आपले साधे आयुष्यदेखील आपल्याला खूप कठिण वाटु लागते. हे आजोबा कधी-कधी लहानमुलांसारखे खोड्यादेखील काढतात. एकदा तर त्यांनी त्यांच्या पत्नीलाच घाबरवले होते.

आजोबा लहानपणापासूनच खोडकर असल्याचे सांगतात. नेहमी आपल्यातल्या खोड्या सुरू ठेवा, आपल्यातल्या लहान मुलाला जिवंत ठेवा कारण दिल तो बच्चा है जी !

Web Title: during lockdown you can learn life lesson from this 90 year old man-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.