शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

खोदकाम करताना क्षणार्धात बदलले मजुराचे नशीब, खाणीत सापडला मोल्यवान हिरा, किंमत तब्बल ६० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:30 IST

Jara Hatke News: मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला सोमवारी कृष्णा कल्याणपूरच्या एका उथळ हिरा खाणीमध्ये १३ कॅरेटचा एक मोठा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत तब्बल ६०  लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

भोपाळ - देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला आला. या मजुराला सोमवारी कृष्णा कल्याणपूरच्या एका उथळ हिरा खाणीमध्ये १३ कॅरेटचा एक मोठा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत तब्बल ६०  लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा हिरा सापडल्यानंतर मजुराच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. एवढेच नाही तर आज सहा अन्य हिरेही सापडले आहे. त्यामुळे कालचा दिवस पन्नासाठी डायमंड डे ठरला. पन्नाच्या भूमीमधून नेहमीच सुंदर हिरे सापडतात. संपूर्ण जगामध्ये सुंदर क्वालिटीचे जेम हिरे येथेच सापडतात.     सोमवारी आदिवासी शेतकरी मुलायम सिंह याला १३ कॅरेटचा हिरा सापडला. हा हिरा पाहून या शेतकऱ्याचे डोळेच विस्फारले. आता त्याच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आता हा हिरा विकून मिळणाऱ्या पैशांमधून मुलांना शिकवणार असल्याचे मुलायम सिंह याने सांगितले.

मुलायम सिंह याला सापडलेल्या हिऱ्याबाबत हिऱ्याची पारख करणारे जवाहिर अनुपम सिंह यांनी सांगितले की, हा सर्वोत्तम दर्जाचा हिरा आहे. तो पुढच्या लिलावामध्ये ठेवण्यात येईल. त्यांनी सांगितले की, आज जे हिरे सापडले आहेत, त्यांची किंमत लाखो रुपये आहे. हे हिरे १३.५४ कॅरेट, ६ कॅरेट, ४ कॅरेट, ४३ सेंट, ३७ सेंट आणि ७४ सेंटचे आहेत. त्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

अनुपम सिंह यांनी सांगितले की, या हिऱ्यांची वास्तविक किंमत लिलावावेळीच कळेल. मात्र ज्या पद्धतीने आज हिरे सापडले आहेत, ते पाहता गरीब लोक खूश आहेत. कारण त्यामुळे त्यांचे भविष्य बदलले आहे. १३ कॅरेटचा हिरा शोधणारा मजूर मुलयम सिंह याला किती पैसे मिळतील, असे विचारले असता हिरा कार्यालयाने सांगितले की, जेव्हा हिऱ्याचा लिलाव होईल, तेव्हा जो पैसा येईल, त्यातील १२ टक्के रक्कम कापून सर्व पैसे मुलायम सिंह याला दिले जातील. जर हिऱ्याचा ६० लाख रुपयांना लिलाव झाला तर मुलायमला ५२.८० लाख रुपये मिळतील. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेश