संकेत शुक्ल - नाशिक
येथील गुलालवाडी व्यायामशाळेत संध्याकाळी फेरफटका मारल्यानंतर सध्या बांगडय़ांच्या मंजुळ आवाजाबरोबरच ढोलचा ढणढणाट ऐकू येतो. दिवसभर संसाराचा गाडा ओढून झाल्यानंतर संध्याकाळी महिला ढोल वाजविण्याची रंगीत तालीम करतात. सध्या नाशिकमध्ये या महिला ढोल पथकाचे विशेष आकर्षण आहे. या पथकात एकाच वेळी तीन पिढय़ाही सहभागी झालेल्या पाहायला मिळतात.
ढोलवादनाच्या क्षेत्रतही राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये महिला ढोल पथके तयार झाली आहेत. नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेनेही युवती आणि स्त्रियांचे लेझीम पथक 15 वर्षापूर्वीच तयार केले होते. त्यातूनच सर्वप्रथम महिलांचे ढोलताशा पथक साकारले गेले. आजमितीस या पथकात सुमारे 1क्क् महिला सहभागी झाल्या आहेत.
ढोल आणि ताशा वाजविणो ही एकेकाळी फक्त पुरुषांची मक्तेदारी समजली जात होती. मात्र आता पुणो, मुंबई, नागपूर अशा मोठय़ा शहरांबरोबरच नाशिकमध्येही महिलांनी आपला ङोंडा रोवला आहे. ढोल वाजविणो हे काम तसे जिकिरीचेच. दिवसभर घरातील कामे आटोपून सायंकाळी नऊवारी साडी परिधान करून दररोज सायंकाळी गुलालवाडी व्यायामशाळेत ढोल वाजविण्याचा सराव करणा:या या महिला पाहिल्यानंतर त्यांच्या उत्साहाचे कौतुक वाटते. अवाढव्य आणि जड असलेला ढोल सांभाळत तब्बल 12 तास वाजविण्याची किमया या मुली आणि महिला कशी साध्य करतात हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. या ढोलपथकात झांज वाजविण्यासाठी दुसरीतील मुलीपासून तर ढोल वाजविणा:या अनेक महिलांमध्ये दोन महिला डॉक्टरांचाही समावेश आहे.
सध्या दोन महिन्यांपासून दररोज किमान 3 तास या महिला ढोल वाजविण्याचा सराव करीत आहेत. मिरवणुकीच्या दिवशी सलग 12 तास ढोल वाजविण्याचे काम या महिलांना करावे लागणार आहे.
व्यायामशाळेचे ढोलपथक फार पूर्वीपासून आहे. ते फक्त पुरुषांचे होते, परंतु 15 वर्षापूर्वी एक महिला येथे ढोल पथकात सहभागी होण्यासाठी आली आणि तेव्हापासून महिलांची संख्या वाढतच गेली. आज महिलांसाठी स्वतंत्र पथक निर्माण करण्याची वेळ आली आहे. मिरवणुकीच्या दिवशी या महिला नऊवारी साडीत वादन करणार आहेत. - बाळासाहेब देशपांडे, प्रशिक्षक
लहानपणापासून मी गणोश विसर्जन मिरवणुकीत ढोलवादन बघायचे.
मला त्याचे आकर्षण होते. आपणही ढोल वाजवावा, असे मला वाटायचे. गुलालवाडी व्यायामशाळेने मला ही संधी दिली.
- स्वप्ना मुकणो,
विद्यार्थिनी
मुलगी लेझीम पथकात नियमित सराव करते. आपणही ढोल वाजवावा, अशी आवड निर्माण झाली. गुलालवाडीत महिला ढोलपथक असल्याने त्यात सहभागी झाले. आता घरकाम सांभाळून मुलीसह या पथकात सहभागी होते.- सोनाली जगताप, गृहिणी