शिलाँग: देशाच्या सर्वच राज्यांमधील पोलीस विभाग सोशल मीडियावर सक्रीय होत आहेत. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन होत असलेली ट्विट्स अनेकदा लक्षवेधीही ठरत आहेत. मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस यात आघाडीवर असताना आता छोट्या राज्यांच्या पोलीस दलांच्या ट्विट्सचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनी केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. कोणाचा ५९० किलो गांजा हरवला आहे का, असा प्रश्न पोलिसांनी ट्विटरवर विचारला होता. यानंतर आता मेघालय पोलिसांच्या ट्विटचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. 'घोटाळ्याबद्दल अलर्ट! शिलाँगच्या बाजारात अमली पदार्थांचा तुटवडा आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारे त्यांच्या ग्राहकांना रसनाची पावडर देत आहेत,' असं मेघालय पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 13:35 IST