शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आता गाढवही देणार नायब तहसीलदार पदाची परीक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 23:02 IST

सरकारी बाबूंचा असाही गाढवपणा

श्रीनगर: समजा तुम्ही एखाद्या शासकीय परीक्षेला बसणार असाल, त्यासाठी तुम्ही अर्ज केला. परीक्षेचं प्रवेशपत्रही तुम्हाला आलं आणि त्यावर तुमच्याऐवजी जर गाढवाचा फोटो असेल, तर तुम्हाला नेमकं काय वाटेल? हे प्रवेशपत्र तयार करणारे गाढव आहेत का? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मात्र असं खरंच घडलंय. जम्मू काश्मीर सरकार लवकरच नायब तहसीलदार पदासाठी प्रवेश परीक्षा घेणाराय. यासाठी छापण्यात आलेल्या एका प्रवेशपत्रावर चक्क गाढवाचं चित्र छापण्यात आलंय. सध्या हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. 

दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी गायीचा फोटो असलेलं प्रवेशपत्र छापलं होतं. या 'गाढव'पणात आता सरकारी कर्मचाऱ्यांनी भर घातलीय. जम्मू आणि काश्मीर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डानं 'काचूर खार' नावानं प्रवेशपत्र तयार केलंय. यावर एका गाढवाचा फोटो आहे. रविवारी  रविवारी जम्मू काश्मीरमध्ये नायब तहसीलदार पदासाठी परीक्षा होतेय. आता या परीक्षेला हे गाढव येणार की या गाढवपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणाराय. ट्विटर सध्या या प्रवेशपत्राची जोरदार चर्चा आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJara hatkeजरा हटके