शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! अनेक वर्षांपूर्वी झाला मालकाचा मृत्यू पण आजही समुद्रकिनारी वाट पाहतोय श्वान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:21 IST

वागुतो हा एक श्वान अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या मालकाची आजही समुद्र किनारी बसून कित्येक तास वाट पाहत आहे.

पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात ईमानदार कोणी असेल तर तो श्वान आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही पाळीव श्वानांची आपल्या घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली तर तेदेखील तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. अशा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. तुमच्या सुरक्षेसाठी ते आपला जीवही धोक्यात घालू शकतात. इतकंच नाही तर वर्षानुवर्षे ते आपल्या मालकाला विसरतही नाहीत. असाच पेरू येथील वागुतो हा एक श्वान अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या मालकाची आजही समुद्र किनारी बसून कित्येक तास वाट पाहत आहे.

जूली मेजिया नावाच्या महिलेनं वागुतो नावाच्या श्वानाची हृदयस्पर्शी कहाणी जगासमोर मांडली आहे. महिलेला लिमा येथील पुंता नेग्रा बीचवर एक दिवस वागुतो बसलेला दिसला. श्वानाला तिथे पाहून तिला प्रश्न पडला की समुद्राच्या किनारी हा कोणाची वाट पाहात असेल. याच दरम्यान एका स्थानिक व्यक्तीने महिलेला वागुतोची गोष्ट सांगितलं. ही गोष्ट महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणली आहे. 

एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीने वागुतोला पाळलं होतं आणि श्वान त्यांच्यासोबतच नेहमी राहात असे. जिथे मालक जाईल, तिथे वागुतो त्याच्यासोबतच जात असे. इतकंच नाही तर मालक मासे पकडण्यासाठी गेला तरी वागुतो किनाऱ्यावर बसून मालकाची वाट बघत असे. जेव्हा मालकाचा मृत्यू झाला तेव्हाही त्याने मालकाला समुद्राच्या किनाऱ्यावरच सोडलं होतं. याच कारणामुळे आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष उलटूनही हा श्वान रोज समुद्रकिनारी येतो आणि मालकाची वाट बघतो. येथे बराच वेळ मालकाची वाट पाहून तो घरी निघून जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा इथे येतो.

वागुतोचा समुद्राकडे पाहातानाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. काही दक्षिण अमेरिकेतील वृत्तपत्रांनीही त्याची कहाणी छापली आहे. मालकाच्या मृत्यूनंतर आता त्याची काळजी त्याच गावातील एक महिला घेते आणि श्वान तिच्याच घरात राहातो. वागुतो तिच्यासोबत आनंदी आहे, मात्र अजूनही तो आपल्या मालकाला विसरलेला नाही. यामुळे तो रोज समुद्रकिनारी जातो. आतापर्यंत त्याची ही गोष्ट फक्त स्थानिक लोकांना माहिती होती, मात्र आता ती जगभरात प्रसिद्ध झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके