शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video - डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी करत होते अन् रुग्ण पाहत होता Football वर्ल्ड कप मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:08 IST

रुग्णालयात ऑपरेशन सुरू असताना एक रुग्ण फीफा वर्ल्ड कप पाहताना दिसत आहे.

सध्या जगभरात फीफा फुटबॉल वर्ल्ड कपची क्रेझ सुरू आहे. प्रत्येक फुटबॉल सामन्यातील 90 मिनिटे कोणालाही मिस करायची नाही. अनेक चाहते कतारला जाऊन स्टेडियममध्ये सामना पाहण्यास प्राधान्य देत आहेत, तर काही जण टीव्ही स्क्रीनला चिकटून बसलेले पाहायला मिळत आहेत. असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एक असा फुटबॉल चाहता समोर आला आहे ज्याला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. 

रुग्णालयात ऑपरेशन सुरू असताना एक रुग्ण फीफा वर्ल्ड कप पाहताना दिसत आहे. भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही या रुग्णाने लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या फॉलोअर्सना विचारले की हा माणूस कोणत्याही प्रकारच्या ट्रॉफीसाठी पात्र आहे का? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा फोटो पोलिश शहरातील किल्समधील हॉस्पिटलने काढला असून आता शेअर केला आहे. 

आनंद महिंद्रा यांनी नोट्स फ्रॉम पोलंडच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट शेअर केलं आहे. 'पोलंडमधील एका रुग्णाने ऑपरेशन थिएटरमध्ये असूनही स्पाइनल एनेस्थेसिया असताना वर्ल्ड कप पाहिला. कील्सचे हॉस्पिटल SP ZOZ MSWiA ने हा फोटो शेअर केला आहे. ट्विटनुसार, पोलंडमधील किल्स येथील रूग्णावर उपचार करणार्‍या रूग्णालयात ही घटना घडली आहे. त्या व्यक्तीवर 25 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

रुग्णाने डॉक्टरांना विचारले की ते सर्जरीदरम्यान तो वेल्स आणि इराणमधील फुटबॉल सामना पाहू शकतात का? त्याची विनंती मान्य करण्यात आली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये टेलिव्हिजन सेट आणण्यात आला आणि त्या रुग्णाला स्पाइनल एनेस्थेसिया देण्यात आला. स्पाइनल एनेस्थेसियाचा उपयोग रुग्ण जागा असताना शरीर कंबरेपासून खाली सुन्न करण्यासाठी केला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.