शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हा आहे जगातील सगळ्यात महागडा धातू, सोन्यापेक्षाही जास्त आहे किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 16:30 IST

चला जाणून घेऊ या धातुमध्ये असं काय आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस का वाढत आहे. 

पृथ्वीवर एकापेक्षा एक अशा मौल्यवान वस्तू आहे ज्या थोड्या जरी सापडल्या तरी व्यक्ती मालामाल होईल. सोनं, चांदी, यूरेनिअम त्यांपैकी एक आहे. पण धातू असाही आहे ज्याची किंमत यांच्यापेक्षाही जास्त आहे. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिथे हा धातू आढळल्याची माहिती मिळते, तेव्हा श्रीमंत देश त्याकडे धाव घेतात. कार कंपन्या यावर नजर ठेवून असतात. चला जाणून घेऊ या धातुमध्ये असं काय आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस का वाढत आहे. 

सध्या जगात सगळ्यात महागडा धातू म्हणजे पॅलेडिअम आहे. दक्षिण आफ्रिकेत पॅलेडिअमला प्लॅटिनमच्या एक बाइप्रोडक्टसारखं काढलं जातं. रशियात याला निकलच्या बाइप्रोडक्टसारखं काढलं जातं. या दोन्ही ठिकाणी पॅलेडिअम सगळ्यात जास्त आढळतं. एक्‍सपर्टनुसार, याची किंमत वेगाने इतकी वाढली कारण जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाहीये.

गाड्यांमध्ये होतो वापर

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा वापर कशात केला जातो? या चमकदार धातुचा वापर गाड्यांच्या उत्सर्जन प्रणालीत होतो. जो नुकसानकारक तत्वांना कार्बन डाइऑक्साइड आणि वाफेत बदलतो. पेट्रोल गाड्यांमध्ये एक्ज़ॉस्टमध्ये वापरला जाणारं कॅटेलिस्टही यापासून तयार केलं जातं. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक, ज्वेलरी आणि दंत चिकित्सेतही याचा वापर केला जातो. सगळ्या देशांचे सरकार प्रदूषणाबाबत नियम कडक करत आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये याचा वापर जास्त होत आहे.

900 टक्के वाढली किंमत

या धातुची मागणी इतकी वाढली आहे की, याची किंमत एका वर्षात दुप्पट झाली आहे. 10 ग्रॅम सामान्य पॅलेडिअमची किंमत 60 हजार रूपये आहे. तेच चांगल्या पॅलेडिअमबाबत सांगायचं तर 10 ग्रॅम पॅलेडिअम सामान्यपणे 80 हजार रूपयांमध्ये मिळतं. 2000 सालापासून याच्या किंमतीत 900 टक्के वाढ झाली आहे. येत्या काळात याची मागणी वाढणार आहे कारण कार बनवणाऱ्या कंपन्या याचा वापर वाढवत आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके