एक असा काळ होतो जेव्हा सायकलवर कित्येक किलोमीटरचा प्रवास केला जात होता. जेव्हा कुणाच्या घरी सायकल आणली तर लोक ती बघण्यासाठी गर्दी करायचे. पण आता काळ बदलला आहे. सायकलची जागा दुसऱ्या वाहनांनी घेतली आहे. पण आजही सायकल चालवणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. काही लोक फिटनेससाठी रोज सायकल चालवतात तर काही लोकांसाठी सायकल आजही त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे. पण अनेकांवा सायकलच्या इतिहासाबाबत फारसं माहीत नाही. चला जाणून घेऊ सायकलच्या इतिहासाच्या काही खास गोष्टी....
सायकलचा इतिहास १९व्या शतकाच्या सुरूवातीला जुळलेला आहे. त्यावेळी घोडागाडीच लोकांच्या येण्या-जाण्यासाठी प्रमुख साधन असायचं. जे लोक घोडागाडीने जाऊ शकत नव्हते, ते कित्येक मैल पायी चालत जात होते.
अशाच लोकांची गरज लक्षात घेऊन जर्मनीच्या Baron Karl Von Drais ने सायकलसारखी दिसणारी एक वस्तू तयार केली. याला तुम्ही सायकलचं पहिलं रूप म्हणू शकता. लाकडापासून तयार या सायकलमध्ये दोन चाकं होती आणि मधे व्यक्तीला बसून पायाने सायकल पुढे ढकलायची होती. याला Laufmaschine म्हटलं जायचं.
Drais च्या या डिझाइनवर इंग्लंडमध्ये काही बदल करून सादर करण्यात आलं. नव्या डिझाइनला Dandy Horse असं म्हटलं जात होतं ही सायकल साधारण ४० वर्षे वापरत होते.
फ्रान्सच्या Pierre Michaux आणि Pierre Lallemen या दोन भावांनी यात पॅंडल आणि व्यक्तीला बसण्यासाठी सीट जोडली. १८६४ मध्ये आलेल्या या सायकलला लोकांनी फार पसंत केलं. दोन्ही भावांनी ४ वर्ष पैसे जमा केले आणि या सायकलचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलं.
दरम्यान, त्यांनी सायकलमध्ये आणखी काही बदल केले आणि नव्या सायकलचं नाव Boneshaker असं ठेवलं. १८६९ मध्ये Eugene Meyer याचं नवं रूप तयार केलं. ही नवी सायकल हलक्या फ्रेमची आणि वेगाने धावणारी होती. यात पुढच्या बाजूला मोठं चाक होतं.
पण ही सायकल अधिक उंच रस्त्यांवर चालवण्यास अडचण येत होती. त्यानंतर काही वर्षांनी John Kemp Starley ने Safety Bicycle नावाची पहिली सायकल सादर केली. या सायकलमध्ये पॅंडल मागच्या चाकांशी जोडलेलं होतं. आणि या सायकलचं हॅंडल गरजेनुसार वळवलं जाऊ शकत होतं.
या सायकलचं नाव रोवर होतं. जी २०व्या शतकाच्या सुरूवातीला लोकांच्या पसंतीस पडली होती. १९०० ते १९५० च्या दशकाला सायकलचा गोल्डन काळ मानलं जातं होतं. कारण तेव्हा लोकांच्या वापरासाठी हे प्रमुख साधन होतं.
६०-७० च्या दशकात सायकलिंगच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवण्याची क्रेझ सुरू झाली. याप्रकारे नंतर Racing Bikes, Mountain Bikes आणि BMX लोकांच्या पसंतीस पडू लागल्या. आजकाल तर कॉम्प्युटरच्या माध्यमातून चालणाऱ्या सायकलही बाजारात आहेत.