शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कावळेही सूड घेतात? मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष लक्षात ठेवतात चेहरा...पाहा काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:07 IST

Do crows take revenge : एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात.

Do crows take revenge : नागाला जर एखाद्या मनुष्यांनं मारलं तर नागिणीच्या डोळ्यात त्याचा चेहरा छापला जातो आणि नंतर नागिण आपला सूड घेते अशी एक मान्यता काही लोकांमध्ये असते. तसेच एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्याला मनुष्यांनी त्रास दिला तर ते प्राणी किंवा पक्षी त्या व्यक्तीचा सूड घेतात, असंही अनेकांना वाटतं. पण याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. तर काही लोकांचा यावर विश्वास नाही.

मात्र, एका वैज्ञानिकाने असा दावा केलाय ज्याबाबत वाचून तुम्ही थक्क व्हाल. एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात.

'डेली स्टार'च्या एका वृत्तानुसार, कावळेही सूड घेतात. हा दावा बर्ड्स एक्सपर्टने केला आहे. त्यांचं मत आहे की, जर कावळ्याचं वैर मनुष्यासोबत झालं तर ते साधारण १७ वर्ष लक्षात ठेवतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करत राहतात. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्रोफेसर जॉन मारजलुफ एक एन्वायरोमेंटल सायंटिस्ट आहेत. 

कावळेही घेतात सूड

२००६ मध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. ज्याद्वारे टेस्ट करण्यात आलं की, कावळेही सूड घेतात का? त्यांना एक मास्क चेहऱ्यावर लावला आणि मग ७ कावळ्यांना एका जाळ्यात अडकवलं. पक्ष्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना बॅंड बांधण्यात आले होते. काही वेळाने त्यांनी कावळ्यांना काहीच इजा न करता सोडून दिलं. जॉनने दावा केला की, सोडून दिल्यानंतरही कावळ्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. जेव्हाही ते मास्क लावून यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून निघत होते, तेव्हा कावळे त्यांच्यावर हल्ला करत होते.

१७ वर्ष कावळ्यांनी ठेवलं लक्षात

अभ्यासकांना रिसर्चमध्ये आढळून आलं की, पक्ष्यांच्या मेंदुमध्येही एक असा भाग असतो स्तनधारींच्या एमिगडाला सोबत मिळता जुळता असतो. एमिगडाला मेंदूचा असा भाग असतो जो इमोशन्सची प्रोसेस करतो. त्यांना आश्चर्य याचं वाटलं की, पक्षी मनुष्यांच्या छोट्या छोट्या वागण्यांकडेही लक्ष देतात. इतकंच नाही तर ते चेहरेही लक्षात ठेवतात. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे कावळ्यांच्या त्या थव्यामधील इतर कावळेही त्यांच्यावर हल्ला करू लागले होते. हे साधारण ७ वर्ष असंच चाललं.

२०१३ नंतर कावळ्यांची हिंसा कमी होत गेली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा ते फिरायला निघाले तेव्हा या घटनेला १७ वर्षे झाले होते. तेव्हा पहिल्यांदा असं झालं की, ते मास्क घालून असूनही कावळ्यांनी त्यांना बघून ना आवाज केला ना त्यांच्यावर हल्ला केला. आता प्रोफेसर जॉन त्यांचा शोध प्रकाशित करण्याचा प्लान करत आहेत.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके