शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अबब! अचानक हायवेवर नोटांचा पाऊस; चालत्या कारमधून 'त्याने' उडवले दीड कोटींहून जास्त पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 17:50 IST

कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने खिडकीतून नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात केली.

अचानक नोटांचा पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरून चालणारे लोक आश्चर्यचकित झाले. कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने खिडकीतून नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात केली. त्यांनी एक-दोन नव्हे तर दीड कोटींहून अधिक रुपये हवेत उडवले. दुसऱ्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं म्हणून असं केल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. अमेरिकेच्या ऑरिगनमध्ये ही घटना घडली आहे. 

डेली स्टारच्या वृत्तानुसार, चालत्या कारमधून नोटा फेकणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीचे नाव कॉलिन डेव्हिस मॅक्कार्थी असं आहे. कॉलिनने कारच्या खिडकीतून जवळपास दोन हजार डॉलर्स (1 कोटी 63 लाखांपेक्षा जास्त) रोख रक्कम फेकून दिली होती. त्याने नोटांचे बंडल फेकण्यास सुरुवात करताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी ते घेण्यासाठी मोठी गर्दी केली. 

काही लोकांनी कॉलिनला तसं न करण्याचं आवाहन केलं आहे. कारण त्याच्या या कृतीमुळे अपघात होऊ शकतो. याच दरम्यान, काहींनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून कॉलिनला अडवले आणि नोटांचे बंडल ताब्यात घेतले.

कॉलिन आणि त्याच्या पालकांचे जॉईंट बँक अकाऊंट असल्याचे सांगण्यात आले. या खात्यातून त्यांनी पैसे काढले होते. पैसे घेऊन तो गाडीत बसला आणि नंतर हायवेकडे निघाला. कॉलिनने चालत्या गाडीची खिडकी उघडली आणि नोटांचे एक एक बंडल हवेत उडू लागले. अनेक मार्गावरून जाणाऱ्यांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली.

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. दरम्यान कारमधून एक व्यक्ती (कॉलिन) नोटा फेकत होती. काही लोक तर रस्त्याच्या मधोमध जाऊन नोटा उचलण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने अपघात झाला नाही. पोलिसांनी कॉलिनवर गुन्हा दाखल केला आहे. तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके