शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना फसवण्यासाठी साडी नेसून, मेकअप करून राहत होता गुन्हेगार; पण एका चुकीनं अडकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:41 IST

Crime Jarahatke : जोधपूर शहरातील पोलीस चार महिन्यांपासून एका सराईत गुन्हेगाराचा शोध घेत होते. हा गुन्हेगार महिलेच्या वेषात आढळून आला. 

Crime Jarahatke : अनेक गुन्हेगार पोलिसांपासून लपून राहण्यासाठी एकतर शहर बदलतात किंवा आणखी काही आयडिया लावतात. मात्र, एका गुन्हेगारानं पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी असा काही कारनामा केला की, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पोलिसांनी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. जोधपूर शहरातील पोलीस चार महिन्यांपासून एका सराईत गुन्हेगाराचा शोध घेत होते. हा गुन्हेगार महिलेच्या वेषात आढळून आला. 

जोधपूर पोलिसांना सूचना मिळाली होती की, हिस्ट्रीशीटर दया शंकर उर्फ बिट्टू जो हत्येच्या प्रयत्नासहीत २७ गुन्ह्यात सहभागी होता. तो त्याच्या घरात लपून होता. पोलिसांची टीम त्याच्या घरी पोहोचली, पण तिथे त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झालेत. घराच्या मुख्य दाराला कुलूप लागलेलं होतं. पण खिडकीतून पाहिलं तर आत एक महिला दिसली. या महिलेनं इशारा करून सांगितलं की, बिट्टू घरी नाहीये. पण पोलिसांना संशय आला.

पोलिसांना संशय आला की, बाहेरून कुलूप आहे आणि आत महिला आहे. इतकंच नाही तर पोलिसांना खिडकीजवळ बीअरची बॉटल आणि सिगारेटचे काही तुकडेही दिसले. हे पोलिसांचा संशय आणखी वाढला. पोलिसांनी लगेच 'महिलेला' ताब्यात घेतलं. तिचा पदर जेव्हा काढला तर समोर दया शंकर उर्फ बिट्टू होता. तो साडी, मंगळसूत्र आणि लेडीज अंगठ्या घालून होता. हे सगळं त्यानं पोलिसांना चकमा देण्यासाठी केलं.

चार महिन्यांपासून फरार

पोलिसांनुसार, दया शंकर गेल्या चार महिन्यांपासून फरार होता. आधी तो उदयपूरमध्ये लपून होता. पण अलिकडेच तो घरी परतला होता. त्याला वाटलं की, महिलेच्या वेषात असलं तर पोलीस त्याला ओळखणार नाहीत. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात आला.

गुन्ह्याची लांब यादी

दया शंकर उर्फ बिट्टूचा गुन्ह्याचा मोठा इतिहास आहे. त्याच्या आणि त्याच्या भावाविरोधात एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. ज्यात हत्येचा प्रयत्न, चोरी आणि मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक लोक त्यांना घाबरत होते. पण यावेळी त्याची चलाखी कामी आली नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी