शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! १७ वर्षाचा मुलगा पडला ७१ वर्षाच्या आजींच्या प्रेमात, सहा वर्षे करतायत सुखाने संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:17 IST

आम्ही तुम्हा अशा कपलबाबत सांगणार आहोत ज्यांच्या वयात तब्बल ५३ वर्षांचं अंतर आहे. त्यातही शॉकिंग म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या कपलपैकी मुलगा अवघ्या १७ वर्षांचा तर महिला तब्बल ७१ वर्षांची

 कधी, कुठे आणि कुणावर होईल हे सांगू शकत नाही. प्रेमाला आता वयाचीही मर्यादा राहिली नाही. सामान्यपणे लग्न करताना पुरुषांचं वय महिलांपेक्षा जास्त किंवा समान असतं. पण बरेच कपल असे आहेत, ज्यांच्यामध्ये महिलांचं वय पुरुषांपेक्षा जास्त आहे. पण वयातील हे अंतर फारफर तर किती असावं. एक वर्षे, दोन वर्षे, पाच वर्षे, दहा वर्षे... बस्सं कपलमधील वयाच्या अंतराचा हा आकडा ऐकूनच तुम्हाला धक्का बसला. पण आम्ही तुम्हा अशा कपलबाबत सांगणार आहोत ज्यांच्या वयात तब्बल ५३ वर्षांचं अंतर आहे. त्यातही शॉकिंग म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या कपलपैकी मुलगा अवघ्या १७ वर्षांचा तर महिला तब्बल ७१ वर्षांची आहे (Couple 53 age gap).

अमेरिकेतील गॅरी  (Gary)आणि अल्मेडा (Almeda) हे विवाहित दाम्पत्य त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहे. त्यांच्यामध्ये इतक्या वर्षांचं अंतर आहे की लोक त्यांना ट्रोल करतात. मिररच्या रिपोर्टनुसार या दोघांचीही पहिली भेट २०१५ साली झाली. अल्मेडाचा मुलगा रॉबर्ट याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी ती गॅरीला भेटली. तेव्हा गॅरी १७ वर्षांचा तर अल्मेडा ७१ वर्षांची होती. या पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं, हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडलं. इतकंच नव्हे तर त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. अवघ्या १५ दिवसांतच त्यांनी लग्न केलं.

२०१५ साली त्यांचं लग्न केलं. गॅरी आता २४ वर्षांचा आहे. तर अल्मेडा ७७ वर्षांची आहे.  हे लग्न यांच्यासाठी सोपं नाही, असं बऱ्याच लोकांनी सांगितलं. जे त्यांच्या नात्याला पाठिंबा देत नाही, त्यांना त्यांनी सोडून दिलं. गॅरी आणि अल्मेडाने आपलं वैवाहिक आयुष्य खूप चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला रिलेशनशिपबाबत काहीच पश्चाताप होत नाही असं सांगितलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके