शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 20:58 IST

सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना...

अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एक विचित्र लग्न पार पडलं. येथे एका जोडप्यावर चक्क टॉयलेटमध्येच लग्न करण्याची वेळ आली. या घटनेमध्ये न्यायाधीशालाही टॉइलेटमध्ये जाऊन लग्न लावून द्यावं लागलं.  टॉयलेटमध्ये लग्न करणा-या नववधूचं नाव मारिया शुलज आणि वराचं नाव ब्रायन असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान अचानक एक वेगळाच प्रसंग झाला.  ब्रायन आणि मारिया न्यू जर्सी येथील  मॉनमाउथ काउंटी कोर्ट हाउसमध्ये लग्न करण्यास पोहोचले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना ब्रायनच्या आईची प्रकृती बिघडली. टॉइलेटमध्ये असताना त्यांना अस्थमाचा अटॅक आला. आईची प्रकृती बिघडल्याचं समजताच ब्रायनने टॉइलेटमध्ये धाव घेतली. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ब्रायनच्या आईला ऑक्सिजन देण्यास सुरूवात झाली, आणि अॅम्ब्युलन्सही बोलावण्यात आली. उपस्थित सर्वजण चिंतेत होते, पण लग्न आजच लागावं अशीही सर्वांची मनोमन इच्छा होती. कारण तेथील नियमानुसार जर लग्न टाळलं असतं तर पुन्हा लग्नाच्या परवान्यासाठी पुढील 45 दिवस वाट पाहावी लागली असती. तसंच लग्नामध्ये आईची उपस्थिती अनिवार्य होती, कारण लग्नाच्या परवान्यावर त्यांची स्वाक्षरी होती. अखेर विचारपूर्वक महिलांच्या टॉयलेटमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्विधा मनःस्थितीत असलेले वधू आणि वर दोघंही तयार झाले, आई तेथेच होती, न्यायाधिशांनीही परवानगी दिली आणि अखेर टॉयलेटमध्येच हे अनोखं लग्न पार पडलं. त्यानंतर आईला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. या दोघांच्या या वेगळ्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  2 जानेवारीची ही घटना आहे.