शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

तब्बल १२३ दिवस हात बांधून सोबत होतं हे कपल, आता नॅशनल टीव्हीसमोर केलं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 18:07 IST

कपलची चेन तोडणारा व्यक्ती लोपुही जोरिनने लिहिले की, 'हे कपल रजिस्ट्री  कार्यालयात चेन कापणार होतं. जेणेकरून स्टीलचं हे बंधन तोडून ते लग्नाच्या बंधनात बांधले जातील.

यूक्रेनच्या एका कपलने नॅशनल टीव्हीवर ब्रेकअप केलं. हेच कपल गेल्या १२३ दिवसांपासून हॅंडकफने एकमेकांसोबत जुळलेले होते. फेब्रुवारीमद्ये खार्किवच्या ३३ वर्षीय ऑनलाइन कार विक्रेता अलेक्झांडर साशा कुडले आणि २९ वर्षीय ब्युटीशिअन व्हिक्टोरिया वीका पुस्तोवितोवाने एक प्रयोग म्हणून आपलं तुटत असलेलं नातं वाचवण्यासाठी हॅंटकफ बांधून राहण्याचा निर्णय घेतला होता.

कपलची चेन तोडणारा व्यक्ती लोपुही जोरिनने लिहिले की, 'हे कपल रजिस्ट्री  कार्यालयात चेन कापणार होतं. जेणेकरून स्टीलचं हे बंधन तोडून ते लग्नाच्या बंधनात बांधले जातील. पण मला त्याचा स्थानावर ही चेन कापावी लागली जिथे १४ फेब्रुवारीला त्यांना चेन बांधली होती'.

डेली मेलच्या वृत्तानुसार, व्हॅलेंटाइन डे पासूनच हे कपल एकमेकांना बांधलं गेलेलं होतं. शॉवर घेण्यापासून ते बाथरूम वापरण्यापर्यंत ते सतत सोबत राहत होते. एकत्र शॉपिंग करत होता, सिनेमे बघत होते, झोपत होते आणि दुसऱ्यांना भेटतही सोबत होते. जसजसे दिवस पुढे गेले साशा आणि वीका यांना त्यांच्या पर्सनल स्पेसची कमतरता जाणवू लागली होती. आणि ते मनातून वेगळे होते गेले. 

कपलने १७ जूनला मीडियासमोर त्यांच्या हातांना बांधलेली चेन तोडली. यावेळी एका मोठ्या कटरने ही चेन कापण्यात आली. मिररनुसार, वीका जिने कधी साशासोबत लग्न करण्याचा प्लॅन केला होता. तिने चेन कापल्यावर लगेच "हुर्रे" असं म्हणत आनंद साजरा केला. 

एकमेकांसोबत चेनने बांधलेले असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अलेक्झांडरने त्याच्या संयुक्त सोशल मीडियावर अकाऊंटवर लिहिले की, जेव्हा आम्ही एखाद्या स्थितीत एक प्लस शोधत होतो, तेव्हा आम्हाला  दोन मायनस मिळत होते. वीकाला तिच्या आधीच्या जगण्यात परत जायचं होतं. ज्या गोष्टी करायला तिला आवडत होत्या त्यांची तिला आठवण येत होती. त्या गोष्टी माझ्यासोबत करण्याचा ती विचार करू शकत नव्हती. नंतर वीकाने सांगितलं की, ती त्यावेळी एक स्वतंत्र व्यक्तीच्या रूपात जगू आणि वाढू शकत नव्हती.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय