शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कोई सरहद ना इन्हे रोके! लॉकडाऊनमध्येही ते सीमेवर भेटतात, गप्पा मारतात अन् आपापल्या घरी जातात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:54 IST

दोन वेगवेगळ्या देशात राहणारं हे कपल दररोज त्यांच्या देशांच्या बॉर्डरवर येऊन एकमेकांसोबत वेळ घालवतं. 

'जिनके सर हो इश्क़ की छाँव, पाँव के नीचे जन्नत होगी' या गुलजारांच्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील. म्हणजे जे प्रेमात असतात त्यांना कशाची काही चिंता नसते. अशाच एका कपलची सध्या चर्चा रंगली आहे. दोन वेगवेगळ्या देशात राहणारं हे कपल दररोज त्यांच्या देशांच्या बॉर्डरवर येऊन एकमेकांसोबत वेळ घालवतं. 

कोरोना व्हायरसमुळे सध्या अनेकांचा वाईट दिवस सुरू आहेत. खासकरून ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवायचा असतो त्यांना भेटूही शकत नाही. पण काही असेही लोक असतात जे जगापेक्षा वेगळे असतात. त्यांना कशाचीही भीती वाटत नाही.

अशाच एका कपलची चर्चा सध्या रंगली आहे. हे दोघे जर्मनी आणि डेन्मार्कच्या बॉर्डरवर रोज भेटतात. आजोबांचं वय आहे 89 आणि आजींचं वय आहे 85. दोघे बसतात, गप्पा करतात, ड्रिंक्स घेतात, खातात आणि आपापल्या घरी जातात.

85 वर्षीय Inga Rasmussen या डेन्मार्कमध्ये राहतात आणि 89 वर्षीय आजोबा Karsten Tuchsen Hansen जर्मनीत राहतात. कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन आठवड्यापासून जर्मनी-डेन्मार्क बॉर्डर बंद करण्यात आली आहे. लोकांनी स्वत:ला लॉकडाऊन घरून घेतलं आहे. पण कोरोना या दोघांना भेटण्यापासून रोखू शकला नाही. ते रोज भेटतात आणि गप्पा करतात.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हे दोघे गेल्या एक वर्षापासून रोज भेटतात. Igna आणि Karsten दोघेही सोशल डिस्टंसिंग ठेवत भेटतात. Karsten हे त्यांच्या ई-बाइकने बॉर्डरवर पोहोचतात तर Inga त्यांच्या कारने येतात.

Igna आणि Karsten दोघेही बॉर्डरवर कठड्याच्या दोन्ही बाजूने बसतात. दोघेही खाण्या-पिण्याच्या वस्तू सोबत घेऊन येतात. हे सगळं करत असताना ते सोशल डिस्टंसिंगचं पूर्ण पालन करतात. तर हे असं आहे प्रेम. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGermanyजर्मनीJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरल