शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सैराट झालं जी; प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने पळून गेलं कपल आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:52 IST

हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या लग्नाला घरातून विरोध आहे. म्हणून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लोकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण अशात काही लोकांचं प्रेमही फूलत आहे. घरच्यांचा विरोध असल्याने अशा स्थितीतही प्रेमी युगुल पळून गेलं होतं. दोघांवरही लॉकडाऊनचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केरळच्या कोझीकोड जिल्ह्याजवळील थामारास्सेरी येथील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी घडली. याच दिवशी 21वर्षांची तरूणी तिच्या 23 वर्षी प्रियकरासोबत पळून गेली. मुळात दोघांचा धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता. 

तरूणीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दोघांना पकडून मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं. कोर्टात तरूणी म्हणाली की, ती तिच्या मर्जीने प्रियकरासोबत गेली होती. दोघेही वयस्क असल्याने दोघांनाही पोलिसांनी सोडलं. 

मात्र, कोर्टाच्या आदेशानुसार कोरोनामुळे लावण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचं थैमान वाढतच असल्याने इतर राज्यांसोबत केरळमध्येही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शिफारस केली जात आहे. लॉकडाऊन वाढवण्यावरही सरकार विचार करत असल्याचे समजते.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटके