शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाच्या पत्रिकेची गोष्ट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 11:19 IST

हटके लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा

लग्न पत्रिका म्हटलं आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट चित्र उभं राहतं. वधू वरांसोबत जवळच्या नातेवाईकांची नावं, विवाह स्थळाचा पत्ता, विवाहाची तारीख, मुहूर्त असं लग्नपत्रिकेचं स्वरुप असतं. मात्र राजस्थानातल्या वाहतूक विभागात काम करणाऱ्या एका महिला उपनिरीक्षकाच्या लग्नाची पत्रिका सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतेय. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झालीय.भरतपूरमध्ये वाहतूक पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या मंजू फौजदार १९ एप्रिलला विवाह बंधनात अडकणार आहेत. सध्या लग्नपत्रिकांच्या वाटपाचं काम जोरात सुरूय. त्यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर वाहतुकीचे नियम छापले आहेत. त्यामुळेच त्यांची लग्नपत्रिका अतिशय लक्षवेधी ठरतेय. लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी मंजू यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर वाहतुकीचे नियम छापले आहेत. वाहतूक पोलीस विभागात काम करत असल्यानं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं काय घडतं, हे मंजू दररोज जवळून पाहतात. बहुतांश तरुण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे वारंवार दुर्घटना घडतात आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करुन सुरक्षित राहावं, असं मंजू यांना वाटतं. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर वाहतुकीचे नियम छापले आहेत. मंजू फौजदार यांच्या कुटुंबावर अपघातांनी अनेक आघात केले आहेत. भरतपूरमधल्या बेलारा कला गावात राहणाऱ्या मंजू यांचे वडिल ईश्वर सिंहदेखील पोलीस विभागात होते. मात्र एका अपघातात त्यांचं निधन झाले. त्यावेळी मंजू अवघ्या एका वर्षाच्या होत्या. मंजू यांचा एकुलता एक भाऊ देवेंद्र सिंहदेखील अपघातानं त्यांच्यापासून हिरावला गेला. मंजू यांनीही पोलीस व्हावं, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मंजूच्या आईनं प्रचंड कष्ट घेतले आणि मंजूनेही त्या कष्टांचं चीज केलं. आता वाहतूक पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या मंजू विवाह बंधनात अडकणार आहेत. अपघातामुळे कोणत्याही कुटुंबाचं नुकसान होऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळेच त्या अनोख्या पद्धतीनं लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतोय.  

टॅग्स :marriageलग्न