शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

एका म्हशीमुळे २ राज्यातील गावांमध्ये संघर्ष; DNA टेस्टची मागणी होताच वाद मिटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:51 IST

हा संघर्ष पोलिसांपर्यंत पोहचला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एका म्हशीमुळे २ राज्यांमधील गावांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. कर्नाटकच्या बेल्लारी तालुक्यातील बोम्मनहाल गाव आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील मेदेहाल गावात हा वाद उफाळून आला आहे. या गावातील वाद सोडवण्यासाठी आता म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला परंतु पोलिसांनी DNA चाचणीविनाच गावातील वादावर तोडगा काढला आहे.

म्हशीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला दोन सीमाभागातील गावांमधील संघर्ष आता शमला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या जत्रेत ही म्हैस बळी देण्यासाठी ठेवली होती. मात्र या म्हशीवर बोम्मनहाल आणि मेदेहाल या दोन्ही गावांनी त्यांचा दावा सांगितला. हा संघर्ष पोलिसांपर्यंत पोहचला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या म्हशीचे सॅम्पल घेऊन तिच्या आईशी सॅम्पल जुळतायेत का हे तपासण्यात येणार होते.

तणाव निवळला कसा?

सीमाभागातील या गावांमध्ये तणाव वाढला असता पोलिसांनी दोन्ही गावातील लोकांसोबत बैठक घेतली. जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या सुक्कमादेवी जत्रेत म्हशीचा बळी देण्यात येणार होता. त्याआधी चारा चरण्यासाठी ही म्हैस माळरानात सोडली होती. परंतु म्हैस चरत चरत आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील मेदेहाल गावात गेली. त्यानंतर बोम्मनहाल गावातील लोक म्हैस परत  आणण्यासाठी गेले असता मेदेहाल गावातील लोकांनी ती परत देण्यास नकार दिला. त्यावरून मोठा वाद पेटला.

पोलिसांकडे हा वाद गेला असता बोम्मनहाल गावातील लोकांनी म्हशीची डीएनए चाचणी करण्यास सांगितले. या म्हशीची आई आमच्या गावात असून तिचा मालकी हक्क आमच्याकडे आहे असं गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर आंध्र प्रदेशातील मोका पोलिसांसह दोन्ही गावातील लोकांची बैठक झाली त्यात कर्नाटकच्या गावकऱ्यांना ही म्हैस सोपवण्याचा निर्णय पोलिसांनी दिला. त्यावर दोन्ही राज्यातील गावकऱ्यांची सहमती झाली. हा मुद्दा तातडीने सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले त्यासोबतच वाद घालणाऱ्या गावकऱ्यांना चांगलेच फटकारले.