शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट शिजवलेला मासा खाणं महागात पडलं; चिनी व्यक्तीनं निम्मं यकृत गमावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 16:07 IST

चार महिन्यांपासून अतिसार, ओटापोटात त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल होण्याची वेळ

बीजिंग: चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनामुळे सगळेच हैराण झाले आहेत. चीनच्या वुहानमधून कोरोना सर्वत्र पसरला. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ६ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. चीनमधील मांस बाजारातून कोरोना पसरल्याचा संशय आहे. मात्र चीननं याचा इन्कार केला आहे. चिनी नागरिकांच्या खाद्यसंस्कृतीमुळे कोरोनाचं संकट ओढावल्याचा आरोप झाला. अनेक तज्ज्ञांनीदेखील याबद्दल संशय उपस्थित केला. यानंतर आता चीनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे.

अर्धवट शिजवलेला मासा खाल्ल्यामुळे एका चिनी व्यक्तीला त्याचं निम्मं यकृत गमावावं लागल्याची घटना हांगझोऊमध्ये घडली. माशाच्या पोटात असलेल्या कृमींनी अंडी घातल्यानं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं वैद्यकीय अहवालांतून समोर आलं. त्यामुळे अर्धवट शिजलेला मासा खालेल्या व्यक्तीला अतिसार, थकवा आणि ओटीपोटात त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला फर्स्ट पीपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास ४ महिने रुग्णाला त्रास होत असल्यानं डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले. त्यावेळी त्यांना रुग्णाच्या यकृतात पू आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे यकृतात १९ सेंटिमीटर लांब आणि १८ सेंटिमीटर रुंद भागात पू पसरला होता. याशिवाय या भागात गाठीदेखील तयार होऊ लागल्या होत्या. यानंतर विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून रुग्णाला क्लोनोरकिआसिस झाल्याचं निष्पन्न झालं. कृमींमुळे हा आजार होतो.रुग्णाचं यकृत वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्यातील सर्व द्रव पदार्थ काढला. यानंतर डॉक्टरांनी यकृत कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यकृतावरील गाठी तीन आठवड्यांनंतरही कायम राहिल्या. इतर कोणताही पर्याय नसल्यानं डॉक्टरांना यकृताचा बाधित भाग काढावा लागला. यामध्ये कृमींची अंडी आढळून आली. आपण अर्धवट शिजवलेला मासा खाल्ल्याची माहिती रुग्णानं डॉक्टरांना दिली. या माशाच्या पोटात असलेल्या कृमींनी रुग्णाच्या पोटात अंडी दिल्यानं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.