शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! लेकीला खेकडा चावला, संतापलेल्या वडिलांनी 'असा' बदला घेतला पण झाली भयंकर अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 14:46 IST

एका मुलीला खेकडा चावलाय यानंतर संतापलेल्या वडिलांनी बदला घेण्याचं ठरवलं.

चीन हा एक अजब देश आहे. तेथील लोकांचे कारनामे हे नेहमीच समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना आता समोर आली आहे. एका मुलीला खेकडा चावला. यानंतर संतापलेल्या वडिलांनी बदला घेण्याचं ठरवलं. बदल्या घेण्यासाठी त्यांनी तो जिवंत खेकडाच खाल्ला आहे. जिवंत खेकडा खाल्ल्याने त्यांची स्थिती आता भयंकर झाली असून रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. 

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील पूर्वेकडील तटील प्रांतात राहणाऱ्या 39 वर्षीय के लू यांनी जिवंत खेकडा खाल्ला. दोन महिन्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. या घटनेच्या दोन महिन्यानंतर त्यांच्या पाठीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लू याचे मेडिकल रिपोर्ट तपासल्यानंतर त्याच्या छाती, पोट आणि लिव्हर आणि पचनसंस्थेत बदल झाल्याचे नमूद केले होते. मात्र असं नेमकं का घडलं याचं कारण मात्र सापडत नव्हतं. 

डॉक्टरांनी कित्येकदा त्यांना याबाबत विचारलं होतं. तुम्ही काही चुकीचं खाल्लं होतं का? ज्यामुळे तुम्हाला एलर्जी होईल, त्यावर त्यांनी प्रत्येकवेळी नाहीच म्हटलं. मात्र लू यांच्या पत्नीने त्याने जिवंत खेकडा खाल्ला असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी त्यांना यामागचं कारणं विचारलं. लूने दिलेले कारण ऐकून डॉक्टरही काहीवेळासाठी हैराण झाले होते. मुलीला खेकडा चावल्याने मी बदला घेण्यासाठी जिवंत खेकडा खाल्ला, असं त्यांनी म्हटलं होतं.

एक छोटी नदी पार करत असताना लू यांच्या मुलीला खेकड्याने चावा घेतला. त्यामुळे रागाच्या भरात जिवंत खेकडा खाल्ला, असं त्यांनी कबुल केलं आहे. त्यानंतर लूची ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याना तीन पॅरासिटिक इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं. कच्च मांस खाल्याने हा आजार होतो. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके