शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:05 IST

लियुने मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि अनेक टेस्टमधून त्याला जावं लागलं. त्याने सगळ्या टेस्ट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. त्याला नोकरीवर ठेवण्यात आलं.

आजकाल सगळ्यात क्षेत्रात स्पर्धा किती वाढली आहे हे तुम्हाला माहीत आहेच. एका नोकरीसाठी हजारो लोक समोर येतात. पण एकालाच नोकरी लागते. याच कारणाने कंपन्याची सिलेक्शन प्रोसेस आणखी कठिण करतात. जेणेकरून बेस्ट कर्मचारी घेता यावा. याच कारणाने एका चीनी कंपनीने इंजीनिअर पदासाठी एक रेसिंगचं चॅलेंज ठेवलं. त्यात कर्मचारी हरला तर त्याला नोकरीवरून काढण्यात आलं.

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनच्या जियांगसू प्रांतातील सुजाओ शहरात लियु (Liu) नावाची एक व्यक्ती राहते. ज्याने त्याच्या कंपनी विरोधात केस दाखल केली आहे. त्याने सांगितलं की, कंपनीने कथितपणे त्याला फक्त या कारणाने नोकरीहून काढलं कारण तो एक रेस पूर्ण करू शकला नाही. कंपनीने त्याच्यासमोर 30 मिनिटात 5 किलोमीटर धावण्याचं चॅलेंज ठेवलं होतं. तेही 40 डिग्री सेल्सियस तापमानात. पण तो हे रस हरला आणि त्याची नोकरी गेली.

रिपोर्टनुसार, लियुने मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि अनेक टेस्टमधून त्याला जावं लागलं. त्याने सगळ्या टेस्ट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. त्याला नोकरीवर ठेवण्यात आलं. पण त्याला हे माहीत नव्हतं की, आणखी एक मोठं चॅलेंज त्याला पूर्ण करायचं आहे. नोकरी जॉइन केल्यावर काही दिवसातच कंपनीने लियुला सांगितलं की, त्याला एक लॉंग डिस्टन्स रनिंग टेस्ट द्यावी लागेल. लियुकडे ट्रेनिंगसाठीही वेळ नव्हता. ज्या दिवशी रेस होती त्या दिवशी तापमान 40 डिग्री होतं.

इतक्या उन्हात केवळ 800 मीटर धावूनच त्याला चक्कर येत होती आणि थांबून कामावर परत आला. कुणी त्याला काहीच बोललं नाही म्हणून त्याला वाटलं की, रेस अशीच ठेवली असेल. दुसऱ्या दिवशी त्याला नोकरीहून काढल्याचं लेटर मिळालं. ज्यात लिहिलं होतं की, तो त्याच्या प्रोबेशन पीरियडमध्ये फेल झाला. 

कंपनीने सांगितलं की, ते ही रेस यासाठी घेतात जेणेकरून कर्मचाऱ्यांमधील काम करण्याची भावना टेस्ट करता यावी. लियुने कोर्टात केस केली आणि सांगितलं की, जॉयनिंगच्या आधी रेसची माहिती देण्यात आली नव्हती. कोर्टानेही त्याचा दावा मान्य केलं आणि कंपनीला आदेश दिला की, नुकसान भरपाई म्हणून लियुला 82 हजार रूपये द्यावे.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके