शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पतीने दगा देऊ नये म्हणून महिलांना मिळतंय खास ट्रेनिंग, इथे सुरू आहे अनोखा कॅम्प! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:10 IST

इथे विवाहित महिलांसाठी खास क्लासेस सुरू झाले आहेत. यामागचं कारण वाचाल तर अवाक् व्हाल...

पती-पत्नी किंवा बॉयफ्रेंन्ड-गर्लफ्रेंन्ड यांनी एकमेकांना दगा दिल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेकदा यामागे दोघांपैकी एकामध्ये काहीतरी कमतरता असेल असं कारण सांगितलं जातं. पण हा समज चुकीचा आहे. चीनमध्ये तर सध्या एक वेगळाच विषय सुरू आहे. इथे विवाहित महिलांसाठी खास क्लासेस सुरू झाले आहेत. यामागचं कारण वाचाल तर अवाक् व्हाल...

चीनमध्ये मध्यम वयाच्या पत्नींसाठी सेक्स अपील ट्रेनिंग कॅम्प सुरू झाले आहेत. जेणेकरून त्यांच्या पतीनी त्यांना दगा देऊ नये. म्हणजे त्यांनी पतीने दुसरीकडे अफेअर करू नये. जुलै महिन्यात महिलांचा एक ग्रुप दोन दिवसीय कार्यक्रमासाठी झेजियांग प्रांतातील हांगझू शहरात बोलवण्यात आला होता. या महिलांकडून २,९९९ युआन म्हणजे जवळपास ३५ हजार रूपये घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं की, सेक्स अपील एक महिलांद्वारे आपल्या जीवनाला कंट्रोल ठेवण्याची पद्धत आहे. हा विचार पारंपारिक चीनी मान्यतांच्या विरूद्ध आहे. जो सेक्सला मुख्यपणे प्रजननासाठी एक संवेदनशील आणि खाजगी बाब मानतो. 

काही रिपोर्टनुसार, या कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या जास्तीत जास्त महिला ३५ ते ५५ वयोगटातील होत्या. नाव सांगण्याच्या अटीवर या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या एका ५४ वर्षीय महिलेने सांगितलं की, ती तिच्या मुलाच्या क्लासमेटकडे आकर्षित झाली होती आणि तेव्हाच तिला तिच्या कमी झालेल्या अट्रॅक्शनबाबत जाणीव झाली.

एका हाऊसवाईफने सांगितलं की, पतीने दगा दिल्यानंतर ती घटस्फोट घेण्याच्या मार्गावर होती. त्याशिवाय इथे पोहोचलेल्या एका सिंगल मदरने हे सांगितलं की, कशाप्रकारे तिच्या पतीने तिला सोडलं होतं आणि तिचे पैसेही घेतले होते. जाहिरात वाचून ती या कॅम्पमध्ये आकर्षित झाली. पोस्टरमध्ये लिहिलं होतं की, तुमच्या विवाहित रस आणा आणि सेक्स लाइफ पुन्हा जिवंत करा.

त्यांनी सांगितलं की, ट्रेनिंगमध्ये त्यांना त्यांच्या सेक्स व्हॅल्यूज शोधण्यास मदत मिळाली आणि त्यांना हा विश्वास देण्यास प्रोत्साहित केलं की, मध्यम वयाच्या महिला सुद्धा शक्तीशाली आणि आकर्षक होऊ शकतात. हा कॅम्प चीनमधील सेक्स अपील अकादमी नावाच्या कंपनीने सुरू केला होता. ट्रेनिंग देण्यासाठी सेक्समध्ये स्पेशलाइज्ड चिकित्सक ठेवले होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन