चीनमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. चीनमधील मीडियानुसार, एका चीनी व्यक्तीने आपल्या प्रेयसीला सतत 10 मिनिटे किस केलं, ज्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, गर्लफ्रेंडला किस केल्यावर या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता संपली.
मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, 22 ऑगस्टला ही घटना घडली. यावेळी प्रियकराला अचानक कानात वेदना जाणवू लागल्या. हे कपल चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील वेस्ट लेकवर डेटला गेलं होतं. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्या कानाच्या प़डद्याला छिद्र पडलं आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, पॅशनेट किसिंगमुळे कानाच्या आत हवेच्या दबावात वेगाने बदल होऊ शकतो. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, किस दरम्यान एका जोडीदाराकडून घेण्यात आलेला मोठा श्वास दुसऱ्या जोडीदाराच्या श्वासासोबत मिळून असंतुलन बनवतो. ज्यामुळे कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकतं.
मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, हे पहिल्यांदा झालेलं नाही. एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, 2008 मध्ये दक्षिण चीनच्या एका महिलेने आपली ऐकण्याची क्षमता गमावली होती. त्यावेळी तिने जोडीदाराला जोरात किस केलं होतं. तेव्हा तिच्या कानाचे पडदे फाटले होते.