शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या वाढदिवशी तरूणानं इतक्या जोरात गायलं गाणं, गाता गाता फुप्फुस फुटलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 15:42 IST

China Weird News : एका व्यक्तीने मित्राच्या वाढदिवशी गाणं गायला सुरूवात केली आणि सूर इतके वरचे लागले की, व्यक्तीचे फुप्फुसं गाणं गाताना पंक्चर झाले.

माणूस जेव्हा खूप आनंदी असतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद जाहीर करत असतो. कुणी आनंदाने उड्या मारू लागतं तर कुणी आनंदाने नाचू लागतं. असाच आनंद चीनमध्ये (China) राहणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या मित्राच्या वाढदिवशी झाला होता. आनंद इतका जास्त झाला होता की तो त्याला चांगलाच महागात पडला. या व्यक्तीने मित्राच्या वाढदिवशी गाणं गायला सुरूवात केली आणि सूर इतके वरचे लागले की, व्यक्तीचे फुप्फुसं गाणं गाताना पंक्चर झाले.

Oddity Central मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव वांग जी आहे. वांग जी याला गाण्याचे वरचे सूर कॅच करणं चांगलंच महागात पडलं. ही व्यक्ती आपल्या मित्राची बर्थ डे पार्टी अटेंड करण्यासाठी गेली होती. तिथे त्याने गाणं गाण्याचा निर्णय घेतला. त्याने गाण्यासाठी “New Drunken Concubine” गाणं निवडलं. हे गाणं आपल्या उंच नोट आणि पिचसाठी ओळखलं जातं. 

२५ वर्षीय या व्यक्तीने पार्टीत गाणं गायला सुरूवात केली. जेव्हा या गाण्यातील वरचा सूर आला, तेव्हाही ही व्यक्ती तो सूर कॅच करण्याचा प्रयत्न करत राहिला. यादरम्यान अचानक त्याच्या छातीत जोरात वेदना झाली. तरीही त्याने कसंतरी गाणं पूर्ण केलं. पार्टी संपवून तो घरी आला, घरी सतत त्याच्या छातीत दुखत होतं. सकाळी जेव्हा वेदना वाढल्या, तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला.

डॉक्टरकडे गेल्यावर त्याचा एक्स-रे काढण्यात आला. या एक्स-रे च्या रिपोर्टने सर्वांनाच हैराण केलं. उंच सूरात गाण्यामुळे त्याची फुप्फुसं पंक्चर झाली होती. छिद्र झाल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. याला मेडिकल टर्मममध्ये pneumothorax असं म्हणतात. यात लंग्स आणि चेस्ट वॉलमधे बबल्स येतात. लगेच त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेने सर्वांनाच हैराण केलं आहे. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके