Weird Crime : चीनमधून नेहमीच अजब अजब घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सामान्यपणे चोराला एखाद्या घरात चोरी केल्याबाबत अटक केली जाते. पण इथे एका चोरानं वेगळाच कारनामा केला. हा चोर एका घरात शिरला आणि त्यानं जबरदस्ती एका महिलेचं रक्त काढून आलं. ज्यासाठी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यानं जे कारण सांगितलं ते अजब आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, एका व्यक्तीनं महिलेच्या घरात घुसून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्या शरीरातून रक्त काढलं आणि फरार झाला. ही अजब घटना 2024 च्या जानेवारी महिन्यात घडली होती. आता यावर कोर्टाचा निकाल आला आहे. ली नावाचा हा चोर यू नावाच्या महिलेच्या घरात सकाळी शिरली होता. त्यावेळी महिला घरात एकटी होती.
यावेळी महिला बेडरूममध्ये झोपत होती. पती बाहेर गेला होता. ली दरवाजा उघडून घरात शिरला. त्यानं महिलेला बेशुद्ध केलं आणि इंजेक्शनद्वारे तिचं रक्त काढलं. जेव्हा तो तेथून पळू लागला तेव्हा महिलेचा पती आला. त्याला अडवण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण तरीही ली पळून जाण्यात यशस्वी ठरला.
शुद्धीवर आल्यावर यू नं सांगितलं की, मला बेडवर एक किट मिळाली. ज्यात रक्त काढण्याचं साहित्य दिसलं. मला डाव्या हातात वेदना होत होती.
एका शेजाऱ्यानं सांगितलं की, या घटनेनंतर अनेकांनी त्यांच्या घरात सिक्युरीटी कॅमेरे बसवले. काही दिवसांनी पोलिसांनी याला शोधून अटक केली. त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान ली यानं असं काही सांगितलं जे फारच अजब होतं. तो म्हणाला की, असं करून त्याचा तणाव दूर होतो. त्यानं केवळ तणाव दूर करण्यासाठी महिलेला बेशुद्ध करून तिच्या हातातून रक्त काढलं होतं.
तो म्हणाला की, त्याला दुसऱ्यांच्या घरात शिरण्यात मजा येते. त्याला चांगलं वाटतं, ज्यामुळे त्याचा तणाव दूर होतो. दुसरीकडे ली याच्यावर चोरी, बलात्कार आणि इतरही अनेक केसेस आधीच लागल्यावर आहेत. महिलेच्या घरात शिरण्याबाबत तो दोषी आढळला असून त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.