शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

चमत्कार! मान कापल्यानंतरही एक आठवड्यापासून जिवंत आहे ही कोंबडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 16:30 IST

आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोंबडी या उपचारांना व्यवस्थितपणे प्रतिसादही देत आहे.

बँकॉक: आजपर्यंत आपण असाध्य आजारावर किंवा दुर्मिळ व्यंगावर मात करून जगणाऱ्या माणसांच्या अनेक कथा ऐकल्या असतील. साहजिकच अशा लोकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे कौतुकही केले जाते. मात्र, थायलंडमधील एक घटना ऐकून तुम्ही आर्श्चयचकित झाल्यावाचून राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थायलंडमधील एक कोंबडी या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, अर्थात त्याचे कारणही तसेच आहे.

या कोंबडीची मान कापली जाऊनही ती गेल्या आठवडाभरापासून जिवंत आहे. हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणायला हवा. मान नसूनही ही कोंबडी इकडेतिकडे फिरत होती. हे पाहून अनेकजण अचंबित झाले. अखेर काही जणांनी या कोंबडीला उपचारांसाठी पशुवैद्यकांकडे नेले. तेव्हा डॉक्टरांनादेखील काहीवेळासाठी धक्काच बसला. या कोंबडीच्या डोक्याच्या जागी रक्ताळलेला मांसाचा गोळा दिसत होता. तेव्हा डॉक्टरांनी मानेतील नलिकेतून या कोंबडीला खायला दिले. त्यानंतर तिला अँटिबायोटिक्स औषधेही देण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोंबडी या उपचारांना व्यवस्थितपणे प्रतिसादही देत आहे. हे पाहून डॉक्टरांनी ही कोंबडी खरी लढवय्यी (true warrior) असल्याचे म्हटले. एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यात या कोंबडीची मान तुटली असावी, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.मात्र, मान नसूनही इतका काळ कोंबडीने जिवंत राहण्याची ही काही पहिली घटना नव्हे. यापूर्वी अमेरिकेतील उताह येथे माईक नावाची कोंबडी अशाचप्रकारे दीर्घकाळ जिवंत राहिली होती. माईक मान नसूनही तब्बल 18 महिने जगली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल