रायगड: छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील धरमजयगढ परिसरातील ओंगना गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या राहत्या घरात विषारी साप शिरला. त्यानं हा साप पकडून खाल्ला. मात्र थोड्याच वेळात त्याची प्रकृती बिघडली. यानंतर त्याला घाईघाईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
ओंगना गावात वास्तव्यास असलेला सनी देओल त्याच्या घरात साफसफाई करत होता. त्यावेळी त्याला एक साप आढळून आला. सनीनं तो साप पकडला. त्यानंतर तो सापाला घेऊन घराबाहेर आला आणि लोकांना स्टंट दाखवू लागला. त्याच दरम्यान साप त्याला चापला. त्यामुळे सनी संतापला. त्यानं सापाचं शिर कापून ते गिळलं.
दफन करण्यात आलेल्या सापासोबत स्टंटओंगना गावात वास्तव्यास असलेल्या सनी देओल राठियाच्या घरी बुधवारी साफसफाई सुरू होती. त्याचवेळी विषारी साप आढळून आला. सनीच्या कुटुंबियांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जमिनीत गाडलं. काही वेळानंतर सनी घरी पोहोचला. त्यावेळी कुटुंबियांनी त्याला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सनीनं गाडलेल्या सापाला बाहेर काढलं आणि ग्रामस्थांना स्टंट करून दाखवू लागला.
सापाचं शिर खाल्ल्यानं सनीची प्रकृती बिघडलीसनीनं सापाला जमिनीतून बाहेर काढलं त्यावेळी तो जिवंत होता. सनी जिवंत सापासोबत स्टंट दाखवत होता. त्यादरम्यान त्याला साप चावला. त्यामुळे सनी भडकला. त्यानं सापाचं शिर दातानं चावून वेगळं केलं आणि ते गिळलं. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं गेलं. सध्या धरमजयगढमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.