शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कमाल! रस्त्यावर दही भल्ले विकायला BMW कारनं येतो, 'करोडपती चाटवाला' म्हणून झाला फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:10 IST

Crorepati Chaatwala: तुम्हाला माहीत नसेल की, रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्ट्रीट फूड विकून एक व्यक्ती कोट्याधीश झाली.

Crorepati Chaatwala: भारतात स्ट्रीट फूडचं नाव घेताच समोसे, कमोरी, भेळ, दही-वडे, दही भल्ले हे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. या पदार्थांची टेस्ट अशी असते की, लोक खाल्ल्याशिवाय राहत नाही. बरेच लोक तर रोज यातील काहीना काही खातात. महत्वाची बाब म्हणजे यांची किंमतही खिशाला परवडेल इतकीच असते. पण तुम्हाला माहीत नसेल की, रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्ट्रीट फूड विकून एक व्यक्ती कोट्याधीश झाली. दिल्लीच्या नेहरू प्लेसमध्ये एक छोटासा स्टॉल आहे जो मुकेश शर्मा चालवतात. आता त्यांना सगळेजण 'करोडपती चाटवाला' नावानं ओळखतात.

मुकेश शर्मा यानी १९८९ मध्ये आपल्या या स्टॉलची सुरूवात केली होती. त्यांच्याकडे काही मोठं दुकान नव्हतं, तेव्हा केवळ एक टेबल होता. एक कार आणि लोकांना टेस्टी खाऊ घालण्याचं स्वप्न होतं. त्यांच्या परिवाराच्या जुन्या रेसिपीनं दही भल्ले बनवणं सुरू केलं. त्यावेळी एका प्लेटची किंमत २ रूपये होती. आज एक प्लेट ४० रूपयाला मिळते. त्यांचा हा स्टॉल दिल्लीतील सगळ्यात प्रसिद्ध फूड स्टॉल्समध्ये गणला जातो.

शर्माजी दही घरीच फेटतात, कारण त्याची टेस्ट क्रीमी आणि ताजी रहावी. तसेच त्यांनी स्वत: बनवलेला मसाला पदार्थाला वेगळं बनवतो. त्यांची मेहनत आणि टेस्टमुळे ते आज दिल्ली फेमस आहेत. त्यांनी कधीच एक दुकान विकत घेऊन पदार्थांची विक्री केली नाही. ते रोज त्यांची BMW कार घेऊन येतात. रस्त्याच्या कडेला स्टॉल लावतात आणि शेकडो लोकांना टेस्टी पदार्थ खायला देतात. त्यांच्या स्टॉलवर नेहमीच गर्दी असते.

सोशल मीडियावरही फेमस

शर्माजी यांचा साधेपणा, स्वच्छता आणि टेस्ट या गोष्टींमुळे ते सोशल मीडियावर फेमस झालेत. अनेक यूट्यूब चॅनल्स आणि इन्स्टाग्राम पेजेसवर त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लोकांना त्यांच्या कहाणीतून प्रेरणा मिळते. आता शर्माजींच्या स्टॉलवर केवळ दही भल्लेच नाही तर पाणीपुरी, समोसे आणि इतरही पदार्थ मिळतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके