शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Cancer Patient Job Interview: कँसरग्रस्त रुग्णाने उपचारादरम्यान दिली मुलाखत, महाराष्ट्रीयन CEO ने दिली थेट नोकरीची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:15 IST

Cancer patient gave job interview: एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा केमोथेरपी दरम्यान नोकरीसाठी मुलाखत देतानाचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

Cancer Patient Intervie: एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा केमोथेरपीदरम्यान नोकरीसाठी मुलाखत देतानाचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या फोटोने हजारो नेटिझन्सना प्रेरित केले आहे. लिंक्डइनवर #OpenToWork बॅज लावणाऱ्या अर्श नंदन प्रसादने(Arsh Nandan Prasad) आजारपणामुळे नोकरी न मिळण्याची धडपड शेअर केली. तसेच, त्याला सहानुभूतीची गरज नसून स्वत:ला सिद्ध करायचे आहे, असे तो म्हणाला.

केमोथेरपी दरम्यान दिली मुलाखत अर्श नंदनने त्याच्या केमोथेरपीदरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर बसून मुलाखत देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत अर्शने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही मुलाखतीत तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करता, पण कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे तुमची निवड केली जात नाही. कंपन्या किती उदार आहेत हे आयुष्य नक्कीच दाखवते. मी कॅन्सरशी लढत असल्याचे रिक्रूटर्सना समजताच त्यांच्या बोलण्यात बदल झालेला दिसतो. पण, मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी येथे आलो आहे.'

अर्शची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल अर्शची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टला 94,000 हून अधिक लाईक्स आणि 3,500 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. नेटिझन्स अर्शच्या धैर्याने आणि लढण्याच्या भावनेने प्रेरित आहेत. एका यूजरने म्हटले की, 'ही फायटिंग स्पिरिट आहे. तुला सलाम.' दुसर्‍याने लिहिले की, 'मी प्रार्थना करतो की तुम्ही लवकर बरे व्हाल. मला तुमच्या जिद्दीचे कौतुक वाटते.' 

महाराष्ट्रीयन CEOने दिली नोकरीची ऑफरया पोस्टने महाराष्ट्रस्थित टेक कंपनी अप्लाइड क्लाउड कॉम्प्युटिंगचे सीईओ निलेश सातपुते यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी अर्शला हवे तेव्हा कंपनीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. निलेश सातपुते अर्शला म्हणाले, 'हॅलो अर्श! तू खरोखर योद्धा आहेस. उपचारादरम्यान मुलाखतीला उपस्थित राहणे थांबव. मी तुझी सर्व कागदपत्रे पाहिली आहेत. तुला पाहिजे तेव्हा तू आमच्या कंपनीत सामील होऊ शकतोस. तुझी मुलाखत होणार नाही.'

टॅग्स :cancerकर्करोगSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलjobनोकरी