शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य लोकही प्रायव्हेट प्लेन बुक करू शकतात का? पाहा यासाठी किती येऊ शकतो खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:03 IST

Interesting Facts : प्रायव्हेट प्लेन पाहून प्रश्न पडला असेल की, सर्वसामान्य लोकही प्रायव्हेट प्लेन बुक करू शकतात का? किंवा जर समजा एक दिवसासाठी जरी प्रायव्हेट प्लेनने कुठे गेलात तर किती खर्च येऊ शकतो?

Interesting Facts : आपण अनेकदा वाचत किंवा बघत असतो की, अमुक व्यक्ती प्रायव्हेट प्लेनने इथे गेला, तिथे गेला. एखादा स्टार प्रायव्हेट जेटने आला. प्रायव्हेट प्लेन अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असतं. आपल्याही मनात आकाशात उडणारं प्रायव्हेट प्लेन पाहून प्रश्न पडला असेल की, सर्वसामान्य लोकही प्रायव्हेट प्लेन बुक करू शकतात का? किंवा जर समजा एक दिवसासाठी जरी प्रायव्हेट प्लेनने कुठे गेलात तर किती खर्च येऊ शकतो? तेच आज आपण जाणून घेऊ.

सगळ्यात आधी तर हा समज डोक्यातून काढला पाहिजे की, प्रायव्हेट प्लेन केवळ उद्योगपती किंवा सेलिब्रिटीज यांच्यासाठीच असतात. सत्य तर हे आहे की, सर्वसामान्य व्यक्तीही प्रायव्हेट प्लेन बुक करू शकतो. यासाठी कुण्या ओळखीची गरज नसते आणि ना सरकारी परवानगीची. फक्त खिसा भरलेला हवा. भारतात अनेक चार्टर एव्हिएशन कंपन्या आहेत, ज्या गरजेनुसार प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर आणि छोटे चार्टर प्लेन भाड्याने देतात. भारतात प्रायव्हेट जेटचं भाडं सामान्यपणे प्रति तासानुसार घेतलं जातं.

किती खर्च येतो?

छोट्या आणि हलक्या चार्टर जेटसाठी प्रति तास खर्च साधारण १.५ लाख ते २ लाख रूपयांपर्यंत असू शकतो. तेच मिड-साइज जेट्सचं भाडं ४ लाख ते ६ लाख रूपये प्रति तास असू शकतं. जर आपण लक्झरी आणि मोठ्या जेट्सचा विचार कराल तर याचा खर्च ८ लाख रूपये प्रति तासांपेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे केवळ २ ते ३ तासांच्या उड्डाणासाठीच १० ते २० लाख रूपयांचं बिल निघू शकतं. इतका तर सर्वसामान्याचा वर्षभराचा पगार असतो.

प्रायव्हेट जेटची किंमत? 

बुकिंगचं आपल्याला समजलं असेलच. आता प्रायव्हेट जेट खरेदी करायचं असल्यास किती खर्च येईल हे पाहुयात. प्रायव्हेट जेट खूप महाग असतात. भारतात एका छोट्या प्रायव्हेट प्लेनची किंमत साधारण १५ ते ३५ कोटी रूपयांपासून सुरू होते. मिड - साइज आणि अॅडव्हान्स जेट्सची किंमत १०० कोटींच्या आसपास असते. तेच जर इंटरनॅशनल लेव्हल लक्झरी जेट्सची किंमत ३०० ते ५०० कोटी रूपये किंवा त्यापेक्षा जास्तही असते.

जुने किंवा सेकंड हँड जेट्स काही प्रमाणात स्वस्त मिळू शकता. त्यांची किंमत तरीही १६ ते २० कोटी रूपयांर्यंत असू शकते. पण त्यांच्या मेन्टनेन्सचा खर्च खूप जास्त असतो. एक जेट ठेवण्यासाठी एअरपोर्टला हँगर चार्ज द्यावा लागतो, जो वार्षिक लाखो ते कोट्यावधी असू शकतो. त्याशिवाय इन्शुरन्स, मेन्टेनन्स आणि टेक्निकल चेकअपसाठी दरवर्षी साधारण १ ते १.५ कोटी रूपये खर्च होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Can common people book private planes? Cost breakdown revealed.

Web Summary : Private plane booking is possible for anyone with sufficient funds. Charter companies offer hourly rentals, ranging from ₹1.5 lakh to crores, depending on the jet's size and luxury. Buying a private jet costs crores, with significant maintenance expenses.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके