शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

बाप रे बाप... पळवलेल्या बॅगेत चोरानं घातला हात अन् डोक्याला झाला ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 17:17 IST

पोलिसांकडून चोराचा शोध सुरू

कॅलिफोर्निया: चोरानं मोठी रोकड लांबवल्याच्या, मौल्यवान वस्तू लंपास केल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. मात्र कॅलिफोर्नियात एक अजब प्रकार घडला आहे. एक चोर एक बॅग घेऊन पसार झाला. मोठी रोख रक्कम हाती लागेल, या आशेनं पळवलेल्या बॅगेत चोरानं हात घेतला आणि त्याला चोरीचा चांगलाच पश्चाताप झाला.आपली बॅग चोरीला गेल्याची तक्रार कॅलिफोर्नियातील सर्पमित्र ब्रायन गंडी यांनी दिली आहे. रोख रकमेसाठी चोरानं बॅग पळवली असावी. मात्र ती बॅग पूर्णपणे सापांनी भरलेली होती, असं सर्पमित्रानं सांगितलं. ब्रायन सापांचं संवर्धन करतात. याशिवाय सापांची विक्री करण्याचा त्यांचा अधिकृत व्यवसायदेखील आहे. शहरातील मार्टिन ल्युथर किंग वाचनालयात सापांबद्दलचं एक व्याख्यान देऊन ब्रायन त्यांच्या घरी परतत होते. त्यावेळी पार्किंगमधील गाडी आणायला जात असताना त्यांनी बॅग पार्किंग झोनच्या बाहेर ठेवली. त्यावेळी बॅगजवळ कोणीच नसल्याचं पाहून एका चोरानं त्यांची बॅग लांबवली. ब्रायन काही वेळानं बॅग ठेवलेल्या ठिकाणी आले, त्यावेळी त्यांना बॅगेतील दोन साप जमिनीवर दिसले. मात्र त्यांची बॅग तिथे नव्हती. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीतील दृश्यांच्या मदतीनं चोर सापडेल, अशी आशा ब्रायन यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Thiefचोरsnakeसाप